Ganesh : गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा, मग दुर्वा घास करा अर्पण; बाप्पाला दु्र्वा घासच का आवडतात? जाणून घ्या त्यामागील कथा

आध्यात्म
भरत जाधव
Updated Sep 01, 2022 | 10:32 IST

सनातन धर्मात (Sanatana Dharma) गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) विशेष महत्त्व असून कालपासून बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. पुढील दहा दिवस गणपती बाप्पाची (Ganapati Bappa) पूजा-अर्चा (Worship) केली जाईल. गणपतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक या दिवसात भाविक विशेष प्रार्थना करत असतात.

Why does Bappa like durva grass? Know the story behind it
बाप्पाला दु्र्वा घासच का आवडतात? जाणून घ्या त्यामागील कथा  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पूजा करताना गणपतीला दोन जोड्यांमध्ये दुर्वा (Durva) अर्पण करणे शुभ मानले जाते.
  • अनेक लोक नियमानुसार गणपती बाप्पांची पूजा करत नाहीत, म्हणून आशीर्वाद मिळत नाही.
  • गणेशीजींना दुर्वा अर्पण केल्या नाहीत तर तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळणार नाहीत.

Bhadrapada Month Ganesh Chaturthi: सनातन धर्मात (Sanatana Dharma) गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) विशेष महत्त्व असून कालपासून बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. पुढील दहा दिवस गणपती बाप्पाची (Ganapati Bappa) पूजा-अर्चा (Worship) केली जाईल. गणपतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक या दिवसात भाविक विशेष प्रार्थना करत असतात. भाविकांवर प्रसन्न झाल्यानंतर गणपती बाप्पा विशेष कृपा करत असतात. मात्र, अनेक लोक नियमानुसार पूजा करत नाहीत, त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही. पूजा करताना गणपतीला दोन जोड्यांमध्ये दुर्वा (Durva) अर्पण करणे शुभ मानले जाते. दुर्वा न वाहिल्यास तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गणपती बाप्पाला दुर्वा घासच का आवडतात.  (wants the blessings of Ganapati, then offer Durva grass; Why does Bappa like durva grass? Know the story)

यंदा 31 ऑगस्टपासून ते 9 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. हे दहाही दिवस गणपत्ती बाप्पा आपल्या भक्तांसोबत राहणार आहेत. ग्रहांच्या स्थितीचा विचार केला तर आणखी एक योगही या वर्षी जुळून येत असल्याचं दिसून आलं आहे, अशात जर तुम्ही पूजाविधी करताना गणेशीजींना दुर्वा अर्पण केल्या नाहीत तर तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळणार नाहीत. यामुळे पूजेसाठी आणि बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी दुर्वा का महत्त्वाच्या आहेत. हे जाणून घेणार आहोत. 

Read Also : हाँगकाँगवर 40 धावांनी पराभव करुन भारताची सरशी

अनलासुरांनी माजवला होता हाहाकार 

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की गणपतीच्या पूजेच्या वेळी बाप्पाला दुर्वा नक्कीच अर्पण केल्या जातात. धार्मिक मान्यतेनुसार गजाननाला दुर्वा अर्पण करण्यामागे एक खास कारण आहे. याबद्दल एक आख्यायिका असून यानुसार, अनलासुर नावाच्या असुराने सर्वत्र हाहाकार माजवला असे मानले जाते. त्याच्या अत्याचाराने माणसांपासून ते देवांपर्यंत सर्वजण त्रस्त झाले होते.

असुराला जिवंत गिळले

असुराच्या दहशतीमुळे चिंतित झालेले सर्व देव गणेशजींकडे गेले. देवांनी अनलासुरापासून मुक्ती मिळावी म्हणून गणपतींकडे प्रार्थना केली. देवतांची प्रार्थना ऐकून भगवान गणपती राक्षसांना त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी निघाले. त्याने अनलासुराला जिवंत गिळले.

गणपतीला दुर्वापासून आराम 

अनलासूरला गिळल्यानंतर गणपती बाप्पांच्या पोटात पीडा आणि जळजळ होऊ लागली. यावर उपाय म्हणून कश्यप ऋषींनी गणेशजींना 21 दूर्वा गाठी खाण्याचा सल्ला दिला. दुर्वा खाल्ल्यानंतर लगेचच गणपतीच्या पोटातील वेदना आणि जळजळ कमी झाली.

Read Also : मुख्यमंत्री शिंदेंच्या या योजनेला म्हाताऱ्यांचा प्रतिसाद

दुर्वामुळे बाप्पा होतात प्रसन्न 

असे मानले जाते की तेव्हापासून त्यांना दुर्वा खूप आवडू लागली आणि त्यांच्या पूजेच्या वेळी दुर्वाच्या 21 गाठी अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होताता आणि भक्तांना त्याचा आशीर्वाद मिळतो.

Read Also : हा उपाय करा लवकरच येईल लग्नाचा योग

अशाप्रकारे अर्पण करा

भक्त गणेशाला दुर्गा अर्पण करतात, परंतु त्यांना त्याचे नियम माहित नाहीत. अशा स्थितीत उपासनेचे पूर्ण फळ मिळत नाही. देवाला अर्पण केलेली दुर्वा मंदिरात किंवा स्वच्छ ठिकाणी वाढलेली असावी. यानंतर ते स्वच्छ पाण्यात धुऊन गंगाजलाने दुर्वाचा अभिषेक करावा. मग गणपतीला दुर्वा गवताच्या 21 जोड्या अर्पण कराव्यात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी