Lalbaugcha Raja 2022 LIVE: राजा भक्तांच्या भेटीला, पाहा लालबागच्या राजाची पहिली झलक

आध्यात्म
रोहित गोळे
Updated Aug 29, 2022 | 20:23 IST

Lalbaugcha Raja 2022 LIVE Darshan: गणेश चतुर्थीसाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र त्याआधीच लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन भाविकांसाठी सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून खुलं झालं आहे. पाहा लालबागच्या राजाची पहिली झलक.

watch the first glimpse of lalbaugcha raja 2022 live ganpati bappa ganeshostav
राजा भक्तांच्या भेटीला, पाहा लालबागच्या राजाची पहिली झलक  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन
  • दोन वर्षानंतर पुन्हा एकदा लालबागचा राजा मूळ रुपात
  • लालबागचा राजासाठी यंदा रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याचा अंदाज

Lalbaugcha Raja: मुंबई: राज्यभरात सध्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. कारण लाडक्या गणरायाचं (Ganpati Bappa) आगमन आता अवघ्या एका दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाचीच लगबग पाहायला मिळत आहे. त्यातच मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) पहिली झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. (watch the first glimpse of lalbaugcha raja 2022 live ganpati bappa ganeshostav)

गणपती बाप्पा सर्व मनोकामना पूर्ण करतो. विघ्नहर्ता आपल्या भक्तांना यश, बुद्धी, पुत्ररत्न, संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतो. त्यामुळे गणेशोत्सव याला महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. आता लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा एकच दिवस बाकी राहिला आहे. तर दुसरीकडे मुंबईत सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. काही वेळापूर्वीच लालबागच्या राजाची पहिली झलक ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 

अधिक वाचा: Hartalika 2022 Aarti: हरितालिकेच्या दिवशी करा 'ही' आरती, माता पार्वती होईल प्रसन्न

तब्बल दोन वर्ष लालबागच्या राजा हा आपल्या मूळ रुपात म्हणजे भव्य-दिव्य स्वरुपात विराजमान झाला आहे. 2020 साली कोरोना संकटामुळे मंडळाने गणेशोत्सव साजरा केला नव्हता. तर 2021 साली मूर्तीच्या उंचीवर असणाऱ्या बंधनामुळे फक्त 4 फूट उंचीची मूर्ती आणली होती. तसंच कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने थेट दर्शनही बंदच होते. 

मात्र, आता कोरोनाचं संकट नसल्याने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे लालबागचा राजा मंडळाने देखील परंपरेप्रमाणे यंदा 20 फूट उंच मूर्ती बनवली आहे. तसंच यावेळी लालबागच्या राजासाठी अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृतीही तयार करण्यात आली आहे.

अधिक वाचा: Happy Ganesh Chaturthi HD Wishes in marathi : गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून द्या शुभेच्छापत्र

31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता 9 सप्टेंबरला बाप्पाच्या विसर्जनाने होणार आहे. या दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी यंदा प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दोन वर्षात भाविकांना राजाचं दर्शन घेता आलं नव्हतं. त्यामुळे यंदा रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याचा अंदाज मंडळाकडून व्यक्त केला जात आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वसामान्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील कलाकार आपल्या कुटुंबीयांसह येथे येत असतात. कारण लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती अशी त्याची ओळख आहे. त्यामुळे देशभरातून भक्त राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येत असतात. लालबागच्या राजाची मूर्ती ही 20 फूट उंच आहे. 1934 साली पहिल्यांदा लालबागमध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तेव्हापासूनच नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी