Moti Gemstone Benefits : या 4 राशींसाठी मोती घालणे खूप शुभ मानले जाते

आध्यात्म
Updated Jul 17, 2022 | 23:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Moti Gemstone Benefits : ज्योतिष शास्त्रानुसार मोती चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. चला जाणून घेऊया मोती घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत.

Wearing moti is considered very auspicious for these 4 Rashi
या राशींसाठी मोती घालणे शुभ मानले जाते  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • मेष,कर्क,वृश्चिक आणि मीन राशीसाठी मोती घालणे शुभ मानले जाते
  • चंद्राप्रमाणे मोतीही शांत आणि शीतल आहे.
  • दक्षिणेकडील समुद्रातील मोती सर्वोत्तम मानले जातात

Moti Gemstone Benefits : रत्नशास्त्रानुसार, कोणतेही रत्न हे एखाद्या ग्रहाचे प्रतिनिधीत्व करतात. तसेच पत्रिकेत एखादा ग्रह कमजोर असेल तर त्याला बळ देण्यासाठी रत्न धारण केले जातात. येथे आपण मोती रत्नाबद्दल बोलणार आहोत, मोती रत्न चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. चला जाणून घेऊयात मोती धारण करण्याचे कोणते फायदे आहेत आणि ते घालण्याची योग्य पद्धत कोणती आहे.


असा असतो मोती : 

रत्न शास्त्रानुसार चंद्राप्रमाणे मोती रत्नही शांत, सुंदर आणि शीतल आहे. त्याचा परिणाम थेट मन आणि शरीराच्या रसायनांवर होतो. मोती गोलाकार आणि पांढरा रंगाचा आहे. जे समुद्रातील शंखांपासून मिळते. दक्षिणेकडील समुद्रातील मोती सर्वोत्तम मानला जातो.


या व्यक्ती मोती घालू शकतात :

रत्न शास्त्रानुसार मेष,कर्क,वृश्चिक आणि मीन राशीसाठी मोती घालणे उत्तम मानले जाते. चंद्राच्या महादशामध्ये मोती घालणे चांगले मानले जाते. चंद्र जरी अशुभ ग्रहांच्या दृष्टीत असला तरी मोती धारण करण्याचा सल्ला दिला जातो. जन्मपत्रिकेत 6व्या, 8व्या किंवा 12व्या घरात चंद्र असला तरीही तुम्ही मोती घालू शकता. पत्रिकेत चंद्र कमजोर स्थितीत असला तरी चंद्राची शक्ती वाढवण्यासाठी मोती धारण केले जाऊ शकतात. दुसरीकडे, पत्रिकेत चंद्र नीच स्थानी असेल तर मोती घालू नये.


मोती घालण्याचे फायदे:

ज्योतिषशास्त्रानुसार मोती धारण केल्याने माता लक्ष्मीची कृपा व्यक्तीवर राहते. यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते. ज्यांना आर्थिक समस्या आहेत त्यांच्यासाठी पांढरे मोती घालणे खूप शुभ मानले जाते. त्याचबरोबर ज्यांना जास्त राग येतो त्यांच्यासाठी मोती घालणे खूप शुभ मानले जाते. मोती धारण केल्याने मन स्थिर राहते आणि रागही कमी येतो. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही मोती घातल्यास तुम्हाला यश मिळू शकते. 

या पद्धतीने मोती घाला:

शुक्ल पक्षाच्या सोमवारी रात्री करंगळीत चांदीच्या अंगठीत मोती धारण करा. कारण रात्री चंद्राची शक्ती वाढते. पौर्णिमेच्या दिवशीही मोती घालता येतात. मोत्याची अंगठी पंचामृतात बुडवून मग गंगेच्या पाण्याने शुद्ध करा, मग ती घाला. मोती धारण केल्यानंतर चंद्राशी संबंधित दान काढून ब्राह्मणाला द्यावे. फक्त पिवळा पुष्कराज आणि कोरल मोत्यासोबत घातले जाऊ शकते, इतर रत्ने मोत्यासोबत घालू नये.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी