लग्नाची तारीख पकडायची बाकी आहे? मग या 12 दिवसात बांधा बाशिंग; जाणून घ्या जूनमधील शुभ मुहूर्तांची यादी

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jun 01, 2022 | 08:31 IST

जून 2022 मध्ये लग्नासाठी 12 शुभ मुहूर्त आहेत. जर लग्नाची तारीख अजून पकडली नसेल तर या जून महिन्यात 12 दिवस आहेत जे तुम्हाला बाशिंग बांधण्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत. या महिन्यात लग्न, मुंडण, गृहप्रवेश, खरेदी, नामकरण आणि जनेऊ संस्कार यासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. 

Wedding date left to catch? Then tie bashing in these 12 days
लग्न, गृहप्रवेशासाठी जूनचा कोणता दिवस आहे शुभ; जाणून घ्या  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • जूनमध्ये गृहप्रवेशासाठी 4 दिवस, लग्नासाठी 12 दिवस आहेत शुभ
  • गृहप्रवेशासाठी 01 जून, 10 जून, 16 जून आणि 22 जून हे दिवस शुभ

मुंबई : जून 2022 मध्ये लग्नासाठी 12 शुभ मुहूर्त आहेत. जर लग्नाची तारीख अजून पकडली नसेल तर या जून महिन्यात 12 दिवस आहेत जे तुम्हाला बाशिंग बांधण्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत. या महिन्यात लग्न, मुंडण, गृहप्रवेश, खरेदी, नामकरण आणि जनेऊ संस्कार यासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. 
जूनमध्ये गृहप्रवेशासाठी 4 दिवस, लग्नासाठी 12 दिवस, वाहन-गृह खरेदीसाठी 8 दिवस, मुंडणासाठी 9 दिवस, नामकरणासाठी 12 दिवस आणि जनेऊ संस्कारासाठी केवळ 2 दिवस शुभ आहेत. जून महिन्यात कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर तुम्हाला येथे शुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती मिळेल. 

जून 2022 चे शुभ मुहूर्त -

गृह प्रवेश मुहूर्त -

तुम्हाला नवीन घराचा गृहप्रवेश जून महिन्यात घ्यायचा असेल तर त्यासाठी 01 जून, 10 जून, 16 जून आणि 22 जून हे दिवस शुभ आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणताही एक दिवस निवडू शकता.

जून 2022 लग्नाचे मुहूर्त -

जून 2022 मध्ये लग्नासाठी 12 शुभ मुहूर्त आहेत. या महिन्यात लग्नाचे शुभ मुहूर्त 01, 05, 06, 07, 08, 09, 10, 11, 13, 17, 23 आणि 24 जून हे लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत.

जून 2022 खरेदीचा मुहूर्त -

या महिन्यात कोणाला नवीन घर, वाहन, फ्लॅट, प्लॉट, दागिने किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल, तर 4, 5, 14, 15, 22, 28, 29 आणि 30 जूनला शुभ मुहूर्त आहे. या 8 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी, तुम्ही पैसे देऊ शकता किंवा शुभ मुहूर्तावर खरेदी करू शकता.

जून 2022 मुंडन संस्कार -

ज्यांना आपल्या मुलाचे मुंडन जूनमध्ये करायचे आहे, त्यांच्यासाठी 1, 2, 3, 4, 9, 10, 23, 24 आणि 30 जून शुभ आहेत. या 9 दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही एका दिवशी मुंडण समारंभ करू शकता.

जून 2022 नामकरण मुहूर्त 

तुम्हाला तुमच्या लाडक्या बाळाचा नामकरण समारंभ जूनमध्ये करायचा असेल, तर 1, 3, 9, 10, 12, 16, 19, 20, 21, 22, 23 आणि 26 जूनला शुभ मुहूर्त आहे. लग्नासोबतच नामकरणासाठी या महिन्यात 12 दिवसांचे शुभ मुहूर्त मिळत आहेत.

जून 2022 जनेऊ मुहूर्त -

या महिन्यात तुमच्या मुलासाठी उपनयन किंवा जनेयू संस्कार करायचे असतील, तर दोनच दिवस शुभ आहेत. एक 10 जून आणि दुसरा 16 जून हा जनेयू संस्कारासाठी शुभ काळ आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती संबधित ज्योतिषांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची हमी देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी