साप्ताहिक राशी भविष्य ११ ते १७ एप्रिल २०२१ : हा आठवडा १२ राशींसाठी कसा?

साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा? जाणून घ्या या राशींचे भविष्य...

Weekly rashi bhavishya 11 to 17 April 2021 weekly horoscope in marathi
साप्ताहिक राशी भविष्य ११ ते १७ एप्रिल २०२१ 

थोडं पण कामाचं

  • साप्ताहिक राशी भविष्य ११ ते १७ एप्रिल २०२१ : हा आठवडा १२ राशींसाठी कसा?
  • कसा जाईल हा आठवडा?
  • पाहा कोणत्या राशीसाठी हा आठवडा कसा?

साप्ताहिक राशी भविष्य 11 to 17 April 2021: आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी आजचा शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा.

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope: बुधवारनंतर आपल्या व्यवसायातील कामाचा विस्तार होईल आणि सामर्थ्य वाढेल. जीवनात सकारात्मक बदलांचा प्रस्ताव स्वीकारला पाहिजे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी गहू दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - लाल.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope: राजकीय व्यक्तींना यश मिळेल. नोकरीत दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडाल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. मंगळवारनंतर व्यवसायाचा विस्तार होईल. मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope: या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना हा आठवडा यश मिळवून देईल. या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासूनच तुमच्यासाठी शुभ संधी चालून येतील. गरीबांना अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - हिरवा.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope: नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा यश मिळवून देईल. व्यवसायातही चांगले यश प्राप्त होईल. धनलाभ होईल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार कराल. मीन आणि धनु राशीच्या व्यक्तींकडून मदत मिळेल. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि लाल.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope: या आठवड्यात आपणास नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. गुरुवारनंतर व्यवसायात चांगला लाभ होईल. या आठवड्यात रखडलेली कामे मार्गी लागतील. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope: या आठवड्यात घर बांधकामाशी संबंधित नवीन कामांना सुरुवात होईल. नवीन व्यावसायिक संबंध तयार होऊ शकतात. विद्यार्थ्यांची प्रगती या आठवड्यात दिसून येईल. धनलाभ होईल. मित्र-मैत्रीणींच्या भेटीमुळे आनंदीत व्हाल. या आठवड्याचा शुभ रंग - निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope: या आठवड्यात विद्यार्थ्यांची प्रगती दिसून येईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना दिलेली जबाबदारी वेळेत पार पाडतील. व्यवसायात रखडलेली कामे, योजना मार्गी लागतील. गरीबांना अन्नदान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा आणि केशरी.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope: या आठवड्यात मंगळवारनंतर धनलाभ होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्र तुमच्या आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील. श्री गणेशाची दररोज पूजा करा. व्यवसायात चांगला लाभ होईल. या आठवड्याचा शुभ रंग - लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope: व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. गुरुवारपर्यंत नोकरीबाबत एक चांगली बातमी मिळेल. या आठवड्यात नव्या कामाचा शुभारंभ केला जाईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope: या आठवड्यात व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. नोकरीत काम पूर्ण केल्याने वरिष्ठ अधिकारी खूश होतील. आरोग्याची काळजी घ्या. गुरुवार नंतर उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. या आठवड्याचा शुभ रंग - पांढरा.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope: या आठवड्यात धनलाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. नव्या कार्याचा शुभारंभ कराल. संपत्ती मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. प्रवासात काळजी घ्या. गरीबांना अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा आणि निळा.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope: या आठवड्यात गुरुवार हा तुमच्यासाठी शुभ दिवस आहे. गुरुवारी नव्या कार्याची सुरुवात करु शकतात. मोठ्या भावाचे सहकार्य तुम्हाला मिळेल. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्य चांगले राहील. या आठवड्याचा शुभ रंग - पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी