शारदीय नवरात्रोत्सवात यंदा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी कराल परिधान? काय असते रंगाचे महत्त्व जाणून घ्या

आध्यात्म
भरत जाधव
Updated Oct 06, 2021 | 11:48 IST

गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. दरम्यान यंदा नवरात्रोत्सव गुरुवार, 7 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

What color sari will you wear on which day of Navratri
शारदीय नवरात्रोत्सवात यंदा कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी कराल परिधान?  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
 • यंदा नवरात्रोत्सव गुरुवार, 7 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे.
 • आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो.

मुंबई : गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. दरम्यान यंदा नवरात्रोत्सव गुरुवार, 7 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात दांडीया, गरबा खेळला जातो पण कोरोनाच्या साथीमुळे राज्यात दांडीया आणि गरब्याला बंदी आहे. पण  नऊ रंगाच्या साड्या घालून महिला हा उत्सव साजरा करू शकतात. नवरात्रोत्सवात नऊ दिवसाला नव - नवीन साड्या घातल्या जातात. ऑफिस, काम, कॉलेजमध्ये जाणाऱ्या महिला, मुली हे रंग अगदी आर्वजून पाळतात. तर जाणून घेऊया यंदा नवरात्रोत्सवात कोणत्या दिवशी कोणता रंग आहे. पहा दिवसानुसार रंगाची संपूर्ण यादी.

शारदीय नवरात्रोत्सव 2021 - 9 दिवसांसाठी रंग:

 • घटस्थापना/प्रतिपदा पहिला दिवस - 7 ऑक्टोबर - पिवळा (Yellow)
 • द्वितीया दुसरा दिवस - 8 ऑक्टोबर - हिरवा (Green)
 • तृतीया तिसरा दिवस - ऑक्टोबर 9 - राखाडी (Grey)
 • पंचमी चौथा दिवस - 10 ऑक्टोबर - नारंगी (Orange)
 • साष्टी पाचवा दिवस - 11 ऑक्टोबर - पांढरा (White)
 • सप्तमी सहावा दिवस - 12 ऑक्टोबर - लाल (Red)
 • अष्टमी सातवा दिवस - 13 ऑक्टोबर - रॉयल ब्लू (Royal Blue)
 • नवमी आठवा दिवस - 14 ऑक्टोबर - गुलाबी (Pink)
 • दशमीचा नववा दिवस - 15 ऑक्टोबर - जांभळा (Purple)

पहिला दिवस पिवळा रंग 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाची स्थापना केली जाते. यालाच घटस्थापना म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री अवताराची पुजा केली जाते. पहिल्या माळीला तुम्ही पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता. हा  रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.

पिवळ्या रंगाचे महत्त्व

प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो उदारणार्थ – फुल, हळद, देवाची वस्त्र, पूजेच्या वेळी पिवळे पितांबर नेसतात, मुलीच्या लग्नात पहिली साडी हि पिवळीच नेसवतात आणि सूर्यकिरणांशी संबधीत असा हा मन प्रसन्न, प्रफुल्लित करणारा पिवळा रंग आहे. म्हणजेच पिवळा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांतेतेसाठी पिवळा रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते आणि चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते. आपल्यामध्ये विश्वास आणि मैत्रीची भावना वाढवण्याचे काम पिवळा रंग करत असतो.

दुसरा दिवस हिरवा रंग 

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रम्हचारिणी या रूपाची पुजा केली जाते. या दिवशी तुम्ही हिरवा रंगाचे कपडे परिधान करू शकतात. या रंगात साडी अप्रतिम डिजाईनमध्ये उपलब्ध असतात. हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो.

हिरव्या रंगाचे महत्त्व 

नवरात्रीचे नऊ रंग मधला तिसरा रंग हिरवा. हिरव्या रंगाची देणगी हि आपल्याला निर्सगाकडूनच मिळालेली आहे. तसेच भारताच्या राष्ट्रीय ध्वजात खालच्या भागात गडद हिरवा रंग आहे. या रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले अतुट नाते दर्शवितो आणि निष्ठा व समृद्धीचा देखील बोध होतो. सौभाग्याचे प्रतीक म्हणून हिरव्या रंगाची ओळख आहे.

तिसरा दिवस राखाडी रंग

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा या देवीची पूजा केली जाते. या दिवशी राखाडी रंगाची साडी परिधान करावी. राखाडी हा रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे वाईट गोष्टींचा नाश. 

राखाडी रंगाचे महत्त्व

राहू आणि केतू हे नवग्रहांमधील दोन ग्रह आहेत त्यांचा आपल्या जीवनावर प्रभाव असतो. तो कमी करण्यासाठी आपल्याला राखाडी रंगाचे रत्न परिधान करावे लागते. स्थिरतेचा, सुरक्षतेचा, कौशल्याचा, शिस्तबद्ध्तेचा असा हा करडा रंग आहे. न्युट्रल रंग म्हणजे राखाडी. या रंगासोबत कोणताही रंग शोभून दिसतो.

चौथा दिवस नारंगी रंग

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुशमंदा देवीच्या रूपाची पुजा केली जाते. नारंगी हा रंग शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे.

नारंगी रंगाचे महत्त्व

हा रंग क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि भरभराट याचं द्योतक आहे. हा रंग स्वातंत्र्य दर्शवणारा आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हा रंग शरीरात रक्तवृद्धी करून सर्व नसांचं पोषण करतो. तसंच पित्ताशय किंवा मूत्राशयात खडा बनवण्याची क्रिया थांबवतो. अंतर्गळ व आंत्रपृच्छाचे विकार बरे करतो. हा रंग लाल आणि पिवळ्या रंगाच्या संयोगाने बनतो. म्हणून शक्ती व उत्साह आणि आरोग्य यांच्याशी हा रंग संबंधित असतो. हा रंग अतिशय पवित्र समजतात. आपल्या आवडीनुसार घरातल्या कोणत्याही एका भिंतीला नारंगी रंगाने रंगवू शकता.

पाचवा दिवस पांढरा रंग

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी भक्त स्कंदमाता या देवीच्या रूपाची पूजा केली. या दिवशी पांढरा रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे. पांढरा रंग शांतता, निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे. 

पांढऱ्या रंगचे महत्त्व

पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठीही वापरला जातो. साधेपणा आणि सात्विकता या रंगातून प्रतीत होते. सगळ्यात शांत रंग म्हणून तो मानला जातो. तसेच तो शुद्धतेचे प्रतीक म्हणूनही मानला गेला आहे. बऱ्याच देशांमधल्या वधू विवाह सोहळ्यात पांढरा रंगांचे वस्त्र परिधान करतात. 

सहावा दिवस लाल रंग

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कातयानी देवीची पूजा केली जाते. या दिवशी महिलांनी लाल रंगाची साडी परिधान करावी. लाल हा रंग आवड, शुभ आणि रागाचे प्रतीक आहे. 

लाल रंगाचे महत्त्व 

वैज्ञानिकदृष्ट्या लाल रंग शरीराची ऊर्जा प्रभावित करतो. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचा प्रतीक मानला जातो. लाल रंग धोका आणि सावधपणा दर्शविण्यासाठी वापरला जातो कारण लाल रंग हा अतिशय आकर्षक असतो. लाल रंगाचा वापर घरातल्या कोणत्याही शुभ कार्यासाठी प्रथम केला जातो. मग ते कोणाचे कपडे किंवा पूजेची फुले असो. याशिवाय पूजामध्ये देखील लाल रंगांची फळे दिली जातात. लाल रंगा मध्ये खूप ऊब असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाल रंग आत्मविश्वास वाढवतो.

सातवा दिवस निळा रंग

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कलातरी देवीच्या रूपाची पूजा केली जाते. या दिवशी निळा रंग परिधान करावा. निळा रगं हा उर्जेचे प्रतीक मानला जातो. 
विश्वासाचं, श्रद्धेचं, सुस्वभावाचं, आत्मीयतेचं प्रतिक म्हणजे निळा रंग.

निळ्या रंगाचे महत्त्व

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे म्हणजेच २४ तास प्रगतीकडे वाटचाल करणारा निळा रंग. शांततेचा प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता हि या रंगाची खास वैशिष्टे. मेंदूवर निळ्या रंगाचा चांगला प्रभाव पडत असतो. वाईट स्वप्न आणि विचार यांना निळा रंग काढून टाकत असतो. निळा रंग हा बौद्धिक क्षमता वाढवण्याचे काम करत असतो. समुद्र आणि आकाश यामध्ये निळ्या रंगाची अनुभूती मिळते. वातविकारांच्या लोकांसाठी निळा रंग लाभदायक ठरतो. स्वयंपाक घरात हा रंग वापरणे टाळावे. देवी नारायणीशी संबंधित असा सुस्वभावी निळा रंग आहे.

आठवा दिवस गुलाबी रंग

नवरात्रीच्या आठव्या दिवशी गौरी देवीची आराधना केली जाते. गुलाबी रंगाचे कपडे परिधान करा. प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, भावनेचा, सृजनतेचा प्रतिकतेचा म्हणजे गुलाबी हा रंग. हा रंग स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी निशाणीसाठी वापरला जातो. प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबी रंगाला महत्त्व आहे.

नववा दिवस जांभळा दिवस

नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीधात्री देवीची पूजा अर्चा केली जाते. जांभळा रंग हा महात्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.

जांभळ्या रंगाचे महत्त्व

 
निसर्गात व्हायलेट/ जांभळा रंग खूप कमी प्रमाणात आढळतो. जसे की लव्हेंडर, ऑर्किड अतिशय नाजूक, सुंदर, दुर्मीळ फुले त्यामुळे आपोआप मौल्यवान. अतिउष्ण (लाल) सर्वांत जास्त शीत (निळा) रंगाच्या मिश्रणाने तयार झालेल्या जांभळ्या रंगात निळ्याची स्थिरता आणि लाल रंगाची ऊर्जा दिसून येते. या रंगाचा शरीर, मन बुद्धी आणि आत्मा या साऱ्यांवर खोल प्रभाव पडतो.

प्रामुख्याने आध्यात्मिक प्रगती, कल्पनाशक्तीला चालना, संवेदनशीलता, सामर्थ्य, कुलीनता, विपुलता, समृद्धी आणि लक्‍झरी यांचे प्रतीक आहे. विद्वत्ता, सन्मान, स्वातंत्र्य, उत्कटता, परिपूर्णता, चैतन्य, ज्ञान, रहस्य आणि जादूशी संबंधित आहे. जांभळा रंग आवडणारे लोक शोधक वृत्तीचे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साही. मानवतावादी, नि:स्वार्थी, शांतताप्रिय, समाधानी, प्रयत्नवादी, आध्यत्मिक, दूरदर्शी असतात. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी