मुंबई: पालीचे(lizard) रूपच असे असते जे पाहून अनेकांना तिची भीती वाटते. पाल जमिनीवर, भिंतींवर, दरवाजे तसेच खिडक्या या कशांवरही रेंगाळताना दिसू शकते. कधी कधी अचानकपणे पाल आपल्या अंगावर पडते आणि लोक घाबरून जातात. तुमच्यासोबतही कधीतरी असे घडले असेल. अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र पाल शरीराच्या काही भागांवर पडणे शुभ आणि अशुभ मानले जाते. शकुन शास्त्रात पाल शरीराच्या विविध भागांवर पडण्यामागचे संकेताबद्दल विस्ताराने दिलेले आहे. what happen if lizard fall on your body
अधिक वाचा - गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त फोटो शेअर करून करा अभिवादन
पुरुषांच्या कानावर पाल पडणे शुभ असते. पुरुषांच्या उजव्या कानावर पाल पडणे दागिने मिळण्याचे संकेत देतात. तर डाव्या कानावर पाल पडल्यास आयुष्य वाढण्याचे संकेत देतात.
नाकावर पाल पडल्यास यास भाग्योदय होणार असल्याचे समजते.
तोंडावर पाल पडण्याचा अर्थ तुम्ही स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेणार आहात.
डाव्या गालावर पाल पडल्यास तुमची भेट एखाद्या प्रिय आणि खास मित्राशी होणार आहे तर उजव्या गालावर पाल पडल्यास तुमच्या आयुष्यात वाढ होणार आहे.
मानेवर पाल पडण्याचे अनेक अर्थ असतात. मानेवर पाल पडण्याचे संकेत असतात की तुम्हाला लवकरच यश आणि वैभव प्राप्त होणार आहे.
पुरुषांच्या दाढीवर पाल पडणे अशुभ संकेत मानले जातात. असं म्हटलं जातं की पुरुषांच्या दाढीवर पाल पडल्यास त्याचा सामना एखाद्या भयानक घटनेशी होऊ शकतो.
जर पाल पुरुषांच्या मिशीवर पडली तर त्या व्यक्तीस सन्मान मिळू शकतो.
कोणाच्या भुवयांवर पाल पडली तर ते अतिशय अशुभ मानले जाते. यामुळे त्या व्यक्तीस मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
एखाद्याच्या डाव्या डोळ्यावर पाल पडण्याचे संकेत मोठ्या हानीचे संकेत देतात. मात्र उजव्या डोळ्यावर पाल पडणे एखाद्या मित्राच्या भेटीचे संकेत देतात.
कंठावर पाल पडण्याचा अर्थ तुमच्या शत्रूंचा नाश होणार आहे.
पाठीवर पाल पडण्याचे अनेक अर्थ आहेत. जर पाठीच्या मध्यभागी पाल पडी तर घरात वाद-विवादाची स्थिती बनू शकते.
पोटावर पाल पडण्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला एखादा दागिना मिळू शकतो.
उजव्या पायावर पाल पडल्यास तुम्हाला यात्रेवर जाण्याचे संकेत मिळतात. तर डाव्या पायावर पाल पडल्यास आजार आणि वादाची शक्यता वाढवते.
अधिक वाचा - लग्नात डान्स करणं वराला पडलं महागात
शरीराच्या विविध भागांवर पाल पडण्याचे संकेत शुभ आणि अशुभ असतात. मात्र पाल जर तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर पडली तर स्नान करण्याचा सल्ला दिला जातो. कारण पाल ही विषारी असते.