Magha Amavasya, Somvati Amavasya : माघ अमावस्या म्हणजे काय? काय करावे आणि काय करू नये?

What is Magha Amavasya or What is Maghi Amavasya or What is Somvati Amavasya? : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार सोमवार 20 फेब्रुवारी 2023 रोजी माघ अमावस्या आहे. माघ अमावस्या या तिथीला द्वापारयुगादी अमावस्या असेही म्हणतात. यंदा माघ अमावस्या सोमवारी येत आहे आणि सोमवारी असणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हणतात.

Magha Amavasya, Somvati Amavasya
माघ अमावस्या म्हणजे काय?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Magha Amavasya : माघ अमावस्या म्हणजे काय?
  • अमावस्येचे तीन प्रकार
  • काय करावे आणि काय करू नये?

What is Magha Amavasya or What is Maghi Amavasya or What is Somvati Amavasya? : महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार सोमवार 20 फेब्रुवारी 2023 रोजी माघ अमावस्या आहे. माघ अमावस्या या तिथीला द्वापारयुगादी अमावस्या असेही म्हणतात. यंदा माघ अमावस्या सोमवारी येत आहे आणि सोमवारी असणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हणतात.

अमावस्या किंवा अमावास्या ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे. ज्या दिवशी (रात्री) पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही त्या दिवशीची (रात्रीची) तिथी ही अमावस्या असते. 

चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असल्यामुळे सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असते. सूर्याच्या प्रकाशामुळे पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही ती असते अमावस्या. 

अमावस्येचे तीन प्रकार आहेत. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या म्हणतात. तसेच अंशतः अमावास्या आणि अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या प्रदेशातली प्रत्येक अमावस्या हा मध्य भारतात, पुढच्या महिन्यातल्या वद्य पक्षातला शेवटचा दिवस असतो. त्या महिन्यातला त्यानंतर आलेला शुक्ल पक्ष महाराष्ट्रातल्या माहे शुक्ल पक्षाबरोबरच असतो.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

  1. सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात.
  2. शनिवारी येणाऱ्या अमावास्येला शनिश्चरी अमावास्या म्हणतात.
  3. भावुका अमावास्या वैशाखात असते. त्यादिवशी शनी जयंती असते.
  4. आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या हे नाव आहे. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तरी भारतात ती श्रावण महिन्यातली अमावास्या असते.
  5. महाराष्ट्रातल्या श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. याच अमावास्येला दर्भग्रहणी अमावास्या (कुशोत्पाटिनी अमावस्या) हे दुसरे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो.
  6. सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात येते. दिवाळीत येणाऱ्या अमावास्येला लक्ष्मीपूजन असते.
  7. मार्गशीर्ष अमावास्येला वेळा अमावास्या हे नाव आहे.
  8. मौनी अमावास्या पौषात येते.
  9. माघ अमावास्येला द्वापारयुगादी अमावास्या म्हणतात.

अमावस्येला काय करावे?

  1. अमावस्येला गरजूंना यथाशक्ती दान करावे. अन्नदान, वस्त्रदान, पैशांच्या स्वरुपातील याला महत्त्व आहे.
  2. पशूपक्ष्यांना अन्न आणि पाणी द्यावे
  3. अमावस्या सुरू होण्याआधी आणि अमावस्या ही तिथी संपल्यानंतर आंघोळ करून देवदर्शन करावे. हनुमानाचे अर्थात मारुतीचे दर्शन घेण्याला महत्त्व आहे.
  4. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सर्वांशी चांगले बोलावे आणि चांगल्या प्रकारे वागावे. प्रामाणिकपणे वागावे. खरे बोलावे.
  5. कायदे नियम यांचे पालन करावे.
  6. अमावस्या सोमवारी असल्यास लक्ष्मी, शंकर, हनुमान या तिन्ही देवतांची पूजा करणे आणि तिन्ही देवतांचे दर्शन घेणे याला महत्त्व आहे.

अमावस्येला काय करू नये?

  1. अमावस्या या तिथीला कोणालाही नाही म्हणू नये. दारात कोणी भीक मागण्यासाठी आल्यास त्याला रिकाम्या हाती पाठवू नये
  2. अमावस्येच्या दिवशी कोणाशी वाईट वागू नये. वाईट बोलू नये. खोटे बोलू नये. खोटेपणा करू नये.
  3. कायदे नियम यांचे उल्लंघन करू नये.
  4. वाद घालू नये. 
  5. नशा करू नये. मद्यपान करू नये, अंमली पदार्थांचे सेवन करू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी