Makar Sankranti 2021: मकर संक्रांतीला तिळाला असते विशेष महत्व, जाणून घ्या पौराणिक कथा

आध्यात्म
Updated Jan 08, 2021 | 15:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला विशेष महत्व असते. यादिवशी तिळाला स्पर्श करण्यापासून ते तिळ खाणे आणि दान करण्याचीही प्रथा आहे. तिळाचे महत्व या विशेष दिवशी इतके का असते जाणून घ्या.

Sesame seeds
Makar Sankranti 2021: मकर संक्रांतीला का असते तिळाचे महत्व, जाणून घ्या पौराणिक कथा  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाने शनीने केली होती सूर्यपूजा
  • सूर्यदेवासोबतच शनीचेही तिळावर आहे अतिशय प्रेम
  • यादिवशी तिळाचे दान, स्नान आणि सेवनाला असते विशेष महत्व

मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण यंदा १४ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य (sun) उत्तरायणात असतो आणि त्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण (festival) साजरा केला जातो. या दिवसापासून मंगलकार्यांना (auspicious functions) सुरुवात होते. पवित्र नदीत (sacred rivers) स्नान (bath) करण्यापासून ते दानपुण्याचेही (donation) यादिवशी विशेष महत्व आहे. यादिवशी तिळाचे दान (sesame donation) केल्याने सर्वात मोठे पुण्य मिळते. यादिवशी तिळाच्या दानासोबतच तिळाच्या पाण्याने स्नान, तिळाला स्पर्श करणे आणि खाणेही आवश्यक असते. यावरून तिळाच्या महतीचा अंदाज येऊ शकतो. मात्र या दिवसाच्या तिळाच्या महत्वाचे रहस्य काय हे इथे आज जाणून घेऊया.

तिळाच्या दानामुळे प्रसन्न होतो सूर्य आणि शनी

तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात. असे मानले जाते की, तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.

जाणून घ्या तिळाच्या महत्वाबद्दलची पौराणिक कथा

श्रीमद्भागवतानुसार सूर्याच्या दोन पत्नी होत्या- छाया आणि संज्ञा. छायाच्या पुत्राचे नाव होते शनिदेव आणि संज्ञाच्या पुत्राचे नाव होते यमराज. सूर्य आणि शनीमध्ये एकदा वितुष्ट आले कारण शनीने सूर्याला त्यांच्यात भेदभाव करताना पाहिले होते. यामुळे संतापून तो आपल्या आईसह सूर्याच्या घराबाहेर निघून गेला. निघताना छायाने आपल्या पतीला म्हणजेच सूर्यदेवाला शाप दिला की त्यांना कुष्ठरोग होईल. शाप खरा ठरला. तेव्हा त्यांच्या मुलाला यमाला त्याचे कष्ट पाहावले नाहीत. त्याने कठीण तप करून त्याला या रोगातून मुक्त केले. सूर्य आपला मुलगा शनीवर इतका नाराज होता की त्याने त्याचे घर म्हणजेच कुंभ जाळून टाकले. कुंभ ही शनीची रास मानली जाते.

सूर्य शनीच्या घरी आला तोच दिवस मकरसंक्रांत

घर जळून गेल्याने शनी आणि त्याच्या आईला कष्ट भोगावे लागले. यामुळे यम खूप त्रस्त झाला आणि त्याने आपल्या वडिलांना म्हणजे सूर्याला बरेच समजावले. यानंतर जेव्हा सूर्यदेव शनीच्या घरी म्हणजेच कुंभात पोहोचला तेव्हा ते कुंभ पूर्णपणे जळून गेले होते. शनीने त्याचे स्वागत करण्यासाठी घरात शिल्लक असलेले तिळाचे तेलच वापरले. ज्यादिवशी सूर्य शनीच्या घरी आला तोच दिवस म्हणजे ही मकरसंक्रांत. शनीच्या पूजेमुळे प्रसन्न होऊन सूर्याने शनीला आशीर्वाद दिला की शनीचे दुसरे घर असलेली मकर रास धनधान्याने भरून जाईल. तिळामुळे शनीला त्याचे वैभव परत मिळाले त्यामुळे तीळ ते त्याला प्रिय झाले आणि यादिवशी शनी आणि सूर्याची पूजा करण्याची प्रथा पडली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी