Solar Eclipse 2022: सूर्यग्रहणाच्या बाबतीत 1300 वर्षांनंतर आला आहे हा योग, ग्रहणानंतर करा हे काम

what to do after surya grahan on 25 october 2022 : यंदाच्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण आज (मंगळवार 25 ऑक्टोबर 2022) आहे. ज्योतिषशास्त्राने ग्रहण संपल्यानंतर करायचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे ते हे उपाय करू शकतात. 

what to do after surya grahan on 25 october 2022
सूर्यग्रहणाच्या बाबतीत 1300 वर्षांनंतर आला आहे हा योग  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण वातावरणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते
  • नकारात्मक ऊर्जेतून बाहेर पडून स्वतःभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपाय
  • ग्रहणानंतर करा हे काम

what to do after surya grahan on 25 october 2022 : यंदाच्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण आज (मंगळवार 25 ऑक्टोबर 2022) आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपतो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्रापाठी झाकला जातो तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. सूर्यग्रहण हे अमावस्येच्या दिवशी होते. पण प्रत्येत अमावस्येला सूर्यग्रहण असतेच असे नाही. कारण प्रत्येक अमावस्येला पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत.

सूर्यग्रहणाचे खगोलीय कारण आणि ज्योतिषशास्त्रातील कारण वेगवेगळे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहण वातावरणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. या ऊर्जेतून बाहेर पडून स्वतःभोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने ग्रहण संपल्यानंतर करायचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे ते हे उपाय करू शकतात. 

Surya Grahan 2022: सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही करू नका 'हे' काम, नाहीतर...

Bhai Dooj: कधी आहे भाऊबीज? जाणून घ्या ओवाळण्याची शुभ वेळ आणि योग्य पद्धत

सूर्यग्रहण संपल्यानंतर करायचे उपाय

  1. सूर्यग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून देवाला नमस्कार करा. देवासमोर बसून 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा अथवा सूर्यदेवाचे नामस्मरण करावे.
  2. सूर्यग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून यथाशक्ती गरजूंना दान करावे. अन्न, औषधे, वस्त्र, पैसे अशा स्वरुपात दान करावे.
  3. सूर्यग्रहण संपल्यानंतर पवित्र नदीत आंघोळ करून देवाला नमस्कार करावा. यानंतर 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा अथवा सूर्यदेवाचे नामस्मरण करावे.
  4. सूर्यग्रहण संपल्यानंतर घर, कामाचे ठिकाण स्वच्छ करावे. स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करावी. ग्रहण संपल्यानंतर जेवण तयार करून जेवावे. जे जेवण ग्रहणाआधी तयार केले आहे ते ग्रहणानंतर खाण्याआधी संबंधित पदार्थावर तुळशीपत्र टाकून नंतर तो पदार्थ खावा. 
  5. सूर्यग्रहण संपल्यानंतर जेवण तयार करा स्वतः जेवणाआधी गायीला जेवण जेवू घाला. 
  6. गरोदर महिलांनी आणि आजारी असलेल्यांनी सूर्यग्रहण बघू नये, सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी बघू नका. ग्रहण बघण्यासाठी तयार केलेल्या चष्म्यांचा वापर करूनच ग्रहण बघावे.
  7. दिवाळी आणि गोवर्धन पूजा यांच्या दरम्यान सूर्यग्रहणाचा योग 1300 वर्षांनंतर आला आहे. बुध, गुरु, शुक्र, शनि आपापल्या राशीत आहेत. ही स्थिती पण 1300 वर्षांनंतर आली आहे. हे ग्रहण भारताता निवडक भागांमध्येच दिसणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी