Gauri Vrat: कुमारी कन्या कधी करतील गौरी व्रत? मुलींनो पूर्ण होईल सर्व मनोकामना, जाणून घ्या तिथी आणि मुहूर्ताची पूजा करा

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jun 19, 2022 | 12:33 IST

गौरी व्रत हे हिंदू धर्मातील अविवाहित मुलींसाठी महत्त्वाचे व्रत आहे. या व्रतामध्ये मुली महादेव शिव आणि माता गौरी यांची पूजा करतात आणि त्यांना चांगला व योग्य वर मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करतात. हे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला सुरू होते आणि पौर्णिमेला समाप्त होत असतो. 

When will virgins fast? Find out the date
कुमारी कन्या कधी करतील गौरी व्रत? जाणून घ्या तिथी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • गौरी व्रत 09 जुलै 2022, शनिवारच्या दिवशी सुरू होईल आणि 13 जुलै 2022, बुधवारी समाप्त होईल.  
  • हिंदू धर्मात आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी देवशयनी एकादशीचे व्रत पाळले जाते. याशिवाय आषाढ पौर्णिमेलाही गुरुपौर्णिमा येते.

Gauri Vrat 2022 date, Puja Muhurt: गौरी व्रत हे हिंदू धर्मातील अविवाहित मुलींसाठी महत्त्वाचे व्रत आहे. या व्रतामध्ये मुली महादेव शिव आणि माता गौरी यांची पूजा करतात आणि त्यांना चांगला व योग्य वर मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करतात. हे व्रत दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला सुरू होते आणि पौर्णिमेला समाप्त होत असतो.   पंचांग नुसार, यावेळी गौरी व्रत 09 जुलै 2022, शनिवारच्या दिवशी सुरू होईल आणि 13 जुलै 2022, बुधवारी समाप्त होईल.  हिंदू धर्मात आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी देवशयनी एकादशीचे व्रत पाळले जाते. याशिवाय आषाढ पौर्णिमेलाही गुरुपौर्णिमा येते.

गौरी व्रत 2022 तारीख

आषाढ महिन्याची शुक्ल एकादशी तिथी  : 09 जुलै 2022, शनिवार दुपारी 04:39 वा
आषाढ शुक्ल पक्ष एकादशी तिथी समाप्त होते: 10 जुलै 2022, रविवार दुपारी 02:13 वा
आषाढ़ माह गुरु पूर्णिमा: 13 जुलाई 2022, बुधवार

गौरी व्रत 2022 पूजा विधि

गौरी व्रताच्या दिवशी मुली पहाटे उठून महादेव शिव आणि माता गौरीसमोर उपवासाचे व्रत करतात. सकाळी उठल्यानंतरच भगवान शिव आणि पार्वती माताची पूजा सुरू करावी. आता महादेव शिव आणि माता गौरी यांच्या मूर्तीची पूजा पदावर आसन घालून स्थापना करा. आता धूप-दीप लावून आरती करताना त्यांना फळे, फुले, अक्षत इत्यादी अर्पण करा.  शेवटी भगवान शिव आणि माता गौरीची आरती करा. त्यानंतर तुमच्या शुभेच्छा त्यांच्यासमोर ठेवा. तसेच पाच दिवस सकाळ संध्याकाळ पूजा करावी. हे व्रत ५ दिवसांचे असून हे व्रत फलदायी असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी