Darsh Amavasya 2023 : कधी आहे दर्श अमावस्या आणि 'या' दिवशी काय करावे

आध्यात्म
Updated Mar 19, 2023 | 11:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

When is Darsh Amavasya and what to do on this day : अमावास्या ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही ती तिथी अमावस्या या नावाने ओळखली जाते.

Amavasya
अमावस्या  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कधी आहे दर्श अमावस्या
  • दर्श अमावस्येच्या दिवशी काय करावे?
  • अमावस्यांचे प्रमुख प्रकार

When is Darsh Amavasya and what to do on this day : अमावास्या ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील तिसावी तिथी आहे. ज्या रात्री पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही ती तिथी अमावस्या या नावाने ओळखली जाते. अमावस्येला चंद्र सूर्याच्या अगदी जवळ असतो. यामुळे चंद्र आकाशात असूनही सूर्याच्या प्रकाशामुळे दिसत नाही. अमान्त पंचांग पाळणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये अमावास्येच्या नंतर येणाऱ्या प्रतिपदेपासून नव्या महिन्याची सुरुवात होते. 

अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते. अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असलेल्या अमावास्येला सिनीवाली अमावास्या म्हणातात. या अमावस्येला अपत्यप्राप्तीसाठी पूजा करण्याचा विधी ऋग्वेदात आढळतो. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या काळात अंशतः चतुर्दशी व अंशतः अमावास्या असेल तर त्या अमावास्येला दर्श अमावास्या, आणि अंशतः अमावास्या व अंशतः प्रतिपदा असेल तर कुहू अमावास्या म्हणतात.

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये अमावास्यान्त महिने असल्याने या प्रदेशातली प्रत्येक अमावस्या हा मध्य भारतात पुढच्या महिन्यातल्या वद्य पक्षातला शेवटचा दिवस असतो. त्या महिन्यातला त्यांचा नंतर आलेला शुक्ल पक्ष महाराष्ट्रातल्या माहे शुक्ल पक्षाबरोबरच असतो.

यंदा फाल्गुन महिन्यातील अखेरच्या दिवशी अर्थात मंगळवार 21 मार्च 2023 रोजी फाल्गुन अमावस्या आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या. यथाशक्ती गरजूंना दान करा. अन्नदान किंवा धान्यदान करा. गरीबांना कपडे आणि अंथरूण पांघरूण पण दान करू शकता. विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत अथवा वही-पुस्तके, शैक्षणिक साहित्य अशा स्वरुपात मदत करा. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिक यांची सेवा करा. चांगला विचार करा आणि चांगली कृती करा. यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यातील अडचणी दूर होतात, प्रगती होते असे सांगतात.

March 2023 Marathi Calendar : मार्च 2023 मधील व्रत, सण, जयंती, पुण्यतिथी, महत्त्वाचे दिवस

Important Days in March 2023 : मार्च महिन्यात साजरे करतात हे महत्त्वाचे दिवस

  1. सोमवारी अमावस्या असल्यास त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात
  2. शनिवारी अमावस्या असल्यास त्या अमावस्येला शनिश्चरी अमावास्या असे म्हणतात
  3. भावुका अमावास्या वैशाखात असते आणि त्या दिवशी शनि जयंती असते
  4. आषाढ महिन्यातल्या अमावास्येला हरियाली अमावास्या किंवा दिव्याची अमावास्या किंवा गटारी अमावास्या म्हणतात. मध्य आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी याच अमावस्येला श्रावणी अमावस्या असेही म्हणतात. 
  5. महाराष्ट्रातल्या श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. याच अमावास्येला दर्भग्रहणी अमावास्या, कुशोत्पाटिनी अमावस्या या नावांनी पण ओळखले जाते. याच दिवशी बैलपोळा असतो. 
  6. सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात येते
  7. दिवाळीत येणाऱ्या अमावास्येला लक्ष्मीपूजन असते
  8. मार्गशीर्ष अमावास्येला वेळा अमावास्या म्हणतात
  9. मौनी अमावास्या पौषात येते
  10. माघ अमावास्येला द्वापारयुगादी अमावास्या म्हणतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी