Ekvira Devi Palkhi Sohala : कधी आहे एकवीरा देवीचा पालखी सोहळा, जाणून घ्या इतिहास

आध्यात्म
Updated Mar 27, 2023 | 14:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Ekvira Devi Temple : उद्या  28 मार्च रोजी गडावर एकवीरा आईचा पालखी सोहळा होणार आहे. दरवर्षी लाखो भाविक या जत्रेला येतात. अनेकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिराला अनेक पर्यटक भेट देत असतात. 

When is Ekvira Devi's palkhi ceremony, know the history
या मंदिर परिसरात एकसारख्या बांधणीची मूळची तीन मंदिरे  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ
  • या मंदिर परिसरात एकसारख्या बांधणीची मूळची तीन मंदिरे
  • प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात

Ekvira Devi Temple : उद्या  28 मार्च रोजी गडावर एकवीरा आईचा पालखी सोहळा होणार आहे. दरवर्षी लाखो भाविक या जत्रेला येतात. अनेकांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिराला अनेक पर्यटक भेट देत असतात. एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते.  (When is Ekvira Devi's palkhi ceremony, know the history)

तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. या मंदिर परिसरात एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती

अधिक वाचा :. कोणत्या राशींवर महादेवाची राहील कृपा; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत, असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते. या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप, वर्षामंडप आणि गोपुर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत.

चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे. बकरी/ कोंबडी यांसह इतरही काही प्राण्यांचे बळी इथे दिले जातात. या देवीकडे चमत्कारी शक्ती आहेत, अशी भाविकांची मान्यता आहे. मात्र पशू बळीवर ट्रस्टकडून बंदी घालण्यात आली आहे. 

अधिक वाचा :रश्मिका मंदान्ना साडीत दिसते फायर, पहा Photo

1866 मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. जवळपास 160 वर्षांपासूनची ही लेणी आहे. पुणे - मुंबई या दोन मेट्रो सिटीच्या मध्यभागी निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही कार्ला लेणी आहे. मंदिरात नियमित पूजा आणि आरती अभिषेक करण्‍यात येतो. तसंच पौर्णिमा आणि आमावस्‍येच्‍या आदल्‍या दिवशी (चतुर्दशी) देवीला पंचामृत स्‍नान करून अभिषेक घातला जातो. नवरात्रोत्‍सवाच्‍या काळात याठिकाणी मोठा उत्‍सव आणि जत्रेचे देखील आयोजन करण्यात येतं.

एकविरा आई आणि जोगेश्वरी अशा दोन मूर्ती या मंदिरात आहेत. नणंद आणि भाऊजय असं या दोघींचं नातं आहे. जोगेश्वरी ही काळ भैरवनाथांची बायको आहे. म्हणजेच काळभैरवनाथ हे एकविरा आईचे भाऊ असं त्यांचं नातं आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी