Ganesh Chaturthi 2022 Date: गणेश चतुर्थी कधी? जाणून घ्या गणेश पूजनाने कोणते ग्रह होतात शांत

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 24, 2022 | 07:03 IST

गणेश चतुर्थी 2022 हा सण देशात विशेषतः महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोक हा सण गणेशाची जयंती म्हणून साजरा करतात. गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi ) उत्सव दरवर्षी भाद्रपद (Bhadrapada) महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला सुरू होतो. गणेश चतुर्थीला मंदिरापासून ते घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि पूर्ण 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. दहा दिवस चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण होत असतात, त्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो.  

Know which planets are pacified by Ganesh Pooja
गणपती बाप्पांच्या पूजेमुळे कुंडलीतील कोणते ग्रह होतात शांत   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गणेश चतुर्थीचा उत्सव दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला सुरू होतो.
  • बाप्पांच्या पूजेने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते, असे मानले जाते.
  • गणपतीच्या पूजेमुळे कुंडलीतील ग्रह शांत होत असतात.

Ganesh Chaturthi 2022 Puja: गणेश चतुर्थी 2022 हा सण देशात विशेषतः महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. लोक हा सण गणेशाची जयंती म्हणून साजरा करतात. गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi ) उत्सव दरवर्षी भाद्रपद (Bhadrapada) महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला सुरू होतो. गणेश चतुर्थीला मंदिरापासून ते घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि पूर्ण 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. दहा दिवस चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण होत असतात, त्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो.  

हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी ज्या घरात गणपतीची मूर्ती बसवली जाते आणि पूर्ण भक्तीभावाने पूजा केली जाते. यावेळी गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला आहे. या 10 दिवसांत गणपतीची विधिवत पूजा केली जाते. बाप्पांच्या पूजेने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते, सर्व संकटे संपत असतात, असे मानले जाते. याशिवाय कुंडलीतील काही ग्रह शांत होऊन शुभ फल प्रदान करतात.

गणेशपूजेने हे ग्रह शांत होतात

ज्योतिषशास्त्रानुसार मुख्यतः बुध आणि केतू हे दोन ग्रह गणेश उपासनेचे शुभ फल देतात. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी नियमानुसार गणेशजींची पूजा करावी. यामुळे कुंडलीतील बुध आणि केतू हे ग्रह शांत आहेत.

Read Also : पुणे: संशयित दहशतवाद्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड

बुध ग्रह: 

ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला शुभ ग्रह मानले जाते. हे मिथुन आणि कन्या राशीचे स्वामी ग्रह आहेत. कन्या ही बुधाची उच्च राशी मानली जाते आणि मीन ही बुधाची नीच्च राशी मानली जाते. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, गणित, लेखन, मनोरंजन, वाद, प्रकाशन, व्यवसाय, मित्र, घसा, नाक इत्यादींचा कारक ग्रह मानला जातो. कुंडलीत हे शुभ असल्यामुळे बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, गणित, व्यवसाय इत्यादी क्षेत्रात वाढ होते.

Read Also : कोणत्या दिवशी कोणती वस्तू खरेदी करणं ठरेल शुभ आणि अशुभ

केतु ग्रह:  

ज्योतिष शास्त्रात केतूला पाप ग्रहाच्या श्रेणीत ठेवले आहे. त्याला छाया ग्रह असेही म्हणतात. तो तर्क, बुद्धिमत्ता, ज्ञान, अलिप्तता, कल्पनाशक्ती आणि मानसिक गुणांचा कारक ग्रह मानला जातो. केतू ग्रह लोकांना चौकटीबाहेर काम करण्यास भाग पाडतो.

गणेश पूजनाचे फायदे 

 गणेशाची पूजा केल्याने बुध ग्रहाशी संबंधित समस्या दूर होतात. त्याचबरोबर केतूची अशुभताही दूर होते.

(डिस्क्लेमर : ही अभ्यासक्रम सामग्री इंटरनेटवरील सामान्य समजुती आणि सामग्रीवर आधारित लिहिली गेली आहे. टाईम्स नाऊ याला दुजोरा देत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी