Guru Purnima 2022 । मुंबई : आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. धार्मिक मान्यतेनुसार चार वेदांचे ज्ञान देणारे महर्षी वेद व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता. मानवजातीसाठी त्यांचे असलेले महत्त्वाचे योगदान पाहता त्यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. महर्षी वेदव्यास यांनी मानवाला प्रथमच चार वेदांचे ज्ञान दिले होते. म्हणूनच त्यांना प्रथम गुरु ही पदवी दिली जाते. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. (When is Guru Purnima, see here the right date, method of worship, auspicious time and importance).
अधिक वाचा : राज्यसभेत नाक कापले आता कपडे सांभाळा,सोमय्यांचा सेनेला इशारा
यंदा गुरू पौर्णिमा १३ जुलै रोजी बुधवारी आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला विशेष महत्त्व आहे. गुरु व्यक्तीला योग्य दिशेने नेण्याचे काम करतात. गुरूंच्या कृपेनेच माणसाला जीवनात यश मिळते. गुरुंच्या सन्मानार्थ, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.