Mohini Ekadashi 2022 in marathi : या दिवशी देवांनी केले होते अमृतपान; जाणून घ्या मोहिनी एकादशी व्रताची कथा

Mohini Ekadashi 2022 | यंदा 12 मे म्हणजेच गुरुवारी मोहिनी एकादशीचे व्रत सर्वत्र केले जाणार आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात. तसेच प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही पक्षांच्या अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते.

When is Mohini Ekadashi and find out the story of Mohini Ekadashi Vrat 
जाणून घ्या मोहिनी एकादशी व्रताची कथा आणि मुहुर्त   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यंदा 12 मे म्हणजेच गुरुवारी मोहिनी एकादशीचे व्रत सर्वत्र केले जाणार आहे.
  • हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात.
  • प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि महत्त्व असते.

Mohini Ekadashi 2022 in marathi  | मुंबई : यंदा 12 मे म्हणजेच गुरुवारी मोहिनी एकादशीचे व्रत सर्वत्र केले जाणार आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात. तसेच प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही पक्षांच्या अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते. (When is Mohini Ekadashi and find out the story of Mohini Ekadashi Vrat). 

अधिक वाचा : पाच वर्षांपेक्षा लहान मुलांना टोमॅट फिव्हरचा धोका

मोहिनी एकादशीचा दिवस दु:ख दूर करणारा 

प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि महत्त्व असते. प्रत्येक एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित असते. मोहिनी एकादशीचे व्रत करून विधिनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मोहिनी एकादशी हा दिवस सर्व प्रकारचे दु:ख दूर करणारा आणि सर्व पापे दूर करणारा दिवस मानला जातो. मोहिनी एकादशी व्रताची कथा समुद्रमंथनाशी संबंधित आहे. 

अधिक वाचा : राज यांनी उत्तर प्रदेशवासियांसह संपूर्ण देशाची माफी मागावी

मोहिनी एकादशी २०२२ चा शुभ मुहुर्त 

मोहिनी एकादशीची सुरुवात - ११ मे २०२२ संध्याकाळी ७.३१ वाजता. 
मोहिनी एकादशीची तिथी संपेल - १२ मे २०२२ संध्याकाळी ६.५१ पर्यंत.

मोहिनी एकादशीची कथा 

पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अमृत पात्र प्राप्त झाले. दरम्यान देव आणि दानव दोघांनाही अमृत प्यायचे होते, यावरून देव आणि दानवांमध्ये अमृत कलश मिळण्यावरून वाद झाला होता.

वादाची परिस्थिती एवढी वाढू लागली की ते युद्धाकडे वळू लागले. अशा स्थितीत हा वाद मिटवण्यासाठी आणि देवतांमध्ये अमृत वाटण्यासाठी भगवान विष्णूंनी एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. या सुंदर स्त्रीचे रूप पाहून असुर मोहित झाले. यानंतर विष्णूजींनी मोहिनीचे रूप धारण करून देवतांना एका रांगेत बसण्यास सांगितले आणि दानवांना एका रांगेत बसण्यास सांगितले आणि देवतांना अमृत पाजले. लक्षणीय बाब म्हणजे हे अमृत ​​पिऊन सर्व देव अमर झाले होते.

मोहिनी एकादशीच्या व्रताची पद्धत 

* मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.  
* स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावीत. 
* नंतर घरातील देव-देवतांची पूजा करा आणि दिवा लावा. 
* भगवान विष्णूची पूजा करून भोग अर्पण करावेत. भगवान विष्णूच्या भोगामध्ये तुळशीचा समावेश करावा.
* भगवंताला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे नेहमी लक्षात ठेवा. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी