Shravan Somwar Vrat 2020: जाणून घ्या श्रावणी सोमवारच्या उपवासादरम्यान काय खावे आणि खाऊ नये! 

Shravan Somwar Vrat 2020: श्रावणी महिन्यातील सोमवार यांना आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्व असतं. यावेळी अनेक व्रत वैकल्य केली जातात. जाणून घ्या यादरम्यान व्रत नेमकं कसं करावं.

Shrawani Somvar
श्रावणी सोमवार  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • लवकरच सुरु होणार श्रावण महिना, जाणून घ्या व्रत वैकल्याविषयी 
  • हे भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती यांना समर्पित आहे
  • या महिन्यात सोमवारी किंवा मंगळवारी भाविक व्रत करतात

मुंबई: जुलै महिना सुरु होताच सर्वांनाच श्रावणाचे वेध लागतात. (shravani somwar)  हा महिना हिंदू धर्मात खूपच शुभ समजला जातो. या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात तसेच अनेक सणही साजरे केले जातात. श्रावणातील सोमवार याला आध्यात्मिकदृष्ट्या खूपच महत्त्व असतं. अनेक शिवभक्त श्रावणात न चुकता सोमवारचं व्रत पाळतात. जाणून घ्या श्रावण महिन्यातील सोमवार, व्रत, उपवास आणि  महत्त्वाचे सण याविषयी.

श्रावण महिन्यात (sawan somwar) शास्त्रानुसार सोमवारी तीन प्रकारचे व्रत केले पाहिजेत. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताची विधी सर्व व्रतांप्रमाणेच असते. या व्रताची सुरूवात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून केली जाते. श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते.

श्रावण २०२० मधील पहिला सोमवार किती तारखेला?

श्रावण महिना हा खरं तर २१ जुलैपासून सुरु होणार आहे. मात्र, याचा पहिला श्रावणी सोमवार हा २७ जुलैला असणार आहे. 

श्रावण महिन्यात एकूण सोमवार किती आणि कधी संपणार श्रावण महिना?
दिनांक श्रावण महिन्यातील सोमवार
२१ जुलै श्रावण महिन्याला सुरुवात
२७ जुलै पहिला श्रावणी सोमवार
३ ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार
१० ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार
१७ ऑगस्ट चौथा श्रावणी सोमवार
१९ ऑगस्ट श्रावण अमावस्या
श्रावणी सोमवारचे व्रत करताना काय खावे काय खाऊ नये?

१) पालेभाज्या आणि वांगी खाणे टाळा.

२) तांदूळ, गहू किंवा डाळीचा वापर टाळावा. काही लोक  दिवसातून एकदाच जेवण करतात ते देखील मीठशिवाय. 

३) लसूण, कांदे किंवा तामसिक स्वरूपाचे कोणतेही  पदार्थ खाऊ नका.

४) सात्त्विक आहार घ्या.

५) दुधाचे सेवन करू नका कारण व्रताच्या दिवशी ते फक्त भगवान शिव यांना अभिषेक करताना अर्पण केले जाते.

श्रावणी सोमवारचं व्रत कसं करावं?

श्रावणात शिवलिंगावर जलाभिषेक केल्यानंतर पार्वती आणि शंकराची एकत्र पूजा करा. यानंतर देवाला फुले अर्पण करा. प्रसाद ठेवा आणि आरती करा. यानंतर चालिसाचे पठण करा. सोमवार व्रत कथा जरूर ऐका. ध्यान झाल्यानंतर ऊँ नमः शिवाय, ऊँ नमः शिवायै' असं म्हणत देवी पार्वतीची पूजा करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी