Weekly Vrat Tyohar 12 To 18 December 202 2 : नवी दिल्ली : पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीसह डिसेंबर महिन्यातील नव्या आठवड्याची सुरुवात होत आहे. या आठवड्यात पौष महिन्याच्या कृष्ण पक्ष दशमी तिथीने समाप्त होणार आहे. 12 ते 18 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात अनेक मोठे उपवास, सण साजरे केले जाणार आहेत.
या आठवड्यात कालाष्टमी, धनु संक्रांती, रुक्मिणी अष्टमी, मासिक कालाष्टमी हे सण साजरे केले जात आहेत. याचबरोबर धनु संक्रांतीसह खरमास सुरू होईल आणि महिनाभर मांगलिक कामे बंद होतील. दरम्यान या महिन्याचा शेवटचा महिना चालू आहे. या महिन्यातील शेवटचे सण आपल्या हातातून सुटता कामा नये. या डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात येणार्या सर्व उपवासाच्या सणांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
16 डिसेंबर 2022, शुक्रवार- रुक्मिणी अष्टमी, धनु संक्रांती, खरमास प्रारंभ, कालाष्टमी
हिंदू पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीच्या दिवशी माता लक्ष्मीचा अवतार रुक्मिणी माता यांच्या जन्म झाला होता. म्हणूनच हा दिवस रुक्मिणी अष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी माता रुक्मिणीसह भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी कृष्णाची पूजा केल्याने शुभ फळ मिळते.
पौष माह की अष्टमी तिथि के दिन कालाष्टमी का व्रत रखा जा रहा है। पौष महिन्याच्या अष्टमी तिथीच्या दिवशी कालाष्टमीचं व्रत ठेवलं जाते. या दिवशी भगवान महादेवाचा अवतार काल भैरवची पूजा केली जाते. या दिवशी कालभैरव पूजा केल्याने दोष, रोगांपासून आपली सुटका होत असते.
धनु संक्रांति 2022 धनु संक्रांती 2022 ज्योतिषानुसार जेव्हा सूर्य कोणत्या राशीमध्ये प्रवेश करतात, तेव्हा संक्राती बनत असते. अशात सूर्य 16 डिसेंबरला धनू राशीमध्ये प्रवेश करत आहे. यामुळे धनु संक्रांती होणार असून या राशीत सूर्य हा 14 डिसेंबरपर्यंत राहणार आहे.