Nirjala Ekadashi Vrat June 2022: हिंदू धर्मात (Hinduism) एकादशी (Ekadashi) तिथीला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. शास्त्रात निर्जला एकादशीचे वर्णन सर्व २४ एकादशींपैकी सर्वात शुभ आणि पुण्यपूर्ण आहे. या एकादशीचे व्रत पाळल्यास पुण्य प्राप्त होते, असा समज भाविकांमध्ये आहे. या दिवशी काही लोक न खाता किंवा पाणी न पिता उपवास करतात. एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित मानली जाते. त्यामुळे या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याचा नियम आहे.
वैदिक पंचांगानुसार, निर्जला एकादशी शुक्रवार 10 जून 2022 रोजी सकाळी 07:26 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 11 जून 2022 रोजी संध्याकाळी 05:44 वाजता समाप्त होईल. 11 जून रोजी उपोषण करण्यात येणार आहे. 11 जून रोजी सकाळी 05.49 ते 08.29 पर्यंत उपवासाची वेळ असेल.

धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. यामुळे व्रत करणाऱ्याच्या मनोकामना पूर्ण होतात. एकादशीचे व्रत केल्याने मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते.