कधीपासून सुरु झाली होती नवरात्रीची सुरूवात, कोणी केलं होतं पहिल्यांदा व्रत 

आध्यात्म
Updated Sep 20, 2019 | 19:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navratri 2019: नवरात्र २९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. याची सुरुवात केव्हा आणि कुणी केली होती हे आपल्याला माहिती आहे? तर जाणून मग जाणून घ्या नवरात्रविषयी खास माहिती. 

when was the beginning of navratri and who did fasting the first time 
कधीपासून सुरु झाली होती नवरात्रीची सुरूवात, कोणी केलं होतं पहिल्यांदा व्रत  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शक्तीस्वरुपा आई दुर्गेची आराधना ही श्रीरामने केली होती 
  • माता चंडीने श्रीरामाला रावण विजयाचा आशीर्वाद दिला होता.
  • हनुमानाने रावणाचा चंडी यज्ञ केला होता खंडीत 

मुंबई: नवरात्र ही वर्षात दोनदा साजरी केली जाते. एक चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र. असं म्हटलं जातं की, शारदीय नवरात्रीची सुरुवात ही सतयुगात झाली होती. त्यामुळे आजही ही नवरात्र तेवढ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते. भक्त आपल्या इच्छेनुसार नवरात्रीत ९ दिवसांचा उपवास करतात. काही जण पहिल्या आणि शेवटच्या दिवशी नवरात्रीचा उपवास करतात. नवरात्रीत आई दुर्गेची नऊ वेगवेगळ्या रुपात पूजा केली जाते. 

आई दुर्गा ही शक्ती स्वरुपा आहे. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याला देखील शक्ती प्राप्त होते असं म्हटलं जातं. पण आपल्या मनात देखील हा विचार येत असेल की, या व्रताची सुरुवात किंवा नवरात्रीची सुरुवात केव्हा आणि कुणी केली होती? तर याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. आपण वाल्मिकी पुराणाच्या आधारे जाणून घेऊयात की, नवरात्रीची सुरुवात नेमकी कधी आणि कुणी केली होती ते. 

ऋष्यमूक पर्वतावर श्रीरामाने केली होती देवीची आराधना: 

वाल्मिकी पुराणानुसार, रावणाच्या वधाआधी भगवान श्रीरामाने ऋष्यमूक पर्वतावर अश्विनी प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आदीशक्ती दुर्गेची उपासना केली होती. यानंतर दशमीच्या दिवशी त्यांनी किष्किंधाहून लंकेला जाऊन रावणाचा वध केला होता. अध्यात्मिक बळाची प्राप्ती, शत्रू पराजय आणि इच्छापूर्तीचा आशीर्वाद श्रीरामाने आदीशक्तीकडून घेतला होता. 

शारदीय नवरात्रीची सुरुवात ही भगवान रामाने केली होती. भगवान रामाने शक्ती स्वरुप आई दुर्गेची आराधना नऊ दिवसांपर्यंत केली होती. यावेळी त्यांनी निर्जळी उपवास केला होता. हे व्रत करण्याचा सल्ला ब्रम्हदेवाने भगवान श्रीरामांना दिला होता. ब्रम्हदेवाने भगवान श्रीरामाला चंडीकेचं पूजन आणि व्रत करुन तिला प्रसन्न करुन घेण्यास सांगितलं होतं. यावेळी त्यांनी असंही सांगितलं होतं की, चंडी पूजन आणि होमासाठी दुर्लभ असे १०८ नील कमल असणे गरजेचे आहेत. 

रावणाला जेव्हा हे माहित पडलं की, भगवान श्रीरामाने चंडीची आराधना सुरु केली आहे तेव्हा त्यांने या यज्ञात खंड टाकण्यासाठी आपल्या मायावी शक्तीने एक नील कमला गायब केलं होतं. त्यामुळे श्रीराम चिंतेत पडले होते. आता हा दुर्लभ नील कमल कुठून येणार याची त्यांना चिंता लागून राहिली होती. पण अचानक त्यांना लक्षात आलं की, त्यांना कमल नयन नवकंच लोचन असं म्हटलं जातं. त्यावेळी त्यांनी आपले डोळे माँ चंडीला अपर्ण करण्याचा संकल्प सोडला. जेव्हा प्रभू श्रीरामाने आपल्या बाणाने स्वत:चे डोळे काढण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी माँ चंडी त्यांना प्रसन्न झाली आणि ती स्वत: त्यांच्यासमोर प्रगट झाली. यानंतर तिने त्यांना तसं करण्यापासून रोखलं. यावेळी चंडीने त्यांना असंही सांगितलं की, ती त्यांच्या आराधनेवर प्रसन्न आहे. त्यानंतर तिने भगवान श्रीरामाला विजयी होण्याचा आशीर्वाद दिला. 

दुसरीकडे रावणाने देखील माता चंडीला प्रसन्न करुन घेण्यासाठी यज्ञ सुरु केला होता. चंडी यज्ञामध्ये जे ब्राम्हण सामील झाले होते त्यांच्यात बालक ब्राम्हणाचं रुप धारण करुन हनुमान देखील उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी