Rakshabandhan: राखी बांधताना तीन गाठ मारणे का आहे गरजेचे? जाणून घ्या

आध्यात्म
Updated Aug 03, 2022 | 17:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Rakshabandhan 2022: रक्षाबंधनाचा सण हा प्रत्येक महिन्याच्या श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पोर्णिमा तिथीला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तसेच त्याच्या दीर्घायुसाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. 

rakshabandhan
राखी बांधताना तीन गाठ मारणे का आहे गरजेचे? जाणून घ्या 
थोडं पण कामाचं
  • रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा गाठ बांधताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
  • राखी बांधताना मनगटावर गाठ बांधण्याला धार्मिक महत्त्व आहे.
  • मनगटावर बांधल्या जाणाऱ्या तीन गाठींचा संबंध देवाशी असतो.

मुंबई: भावा-बहिणीच्या नात्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी हिंदू धर्मात रक्षाबंधनाचा सण(rakshabandhan festival) साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करतात. तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. म्हणण्यासाठी तर हा भावा-बहिणीचा उत्सव आहे मात्र हा साजरा करताना काही गोष्टींचे ध्यान राखणे गरजेचे आहे. जाणून घ्या काय आहेत गोष्टी...why 3 knot is compulsary in rakshabandhan

अधिक वाचा - नॅन्सी पेलोसी पागल आहे, नेहमी देशासाठी...: डोनाल्ड ट्रम्प

बांधा तीन गाठी

रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा गाठ बांधताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. कारण तुम्ही राखी बांधताना विचार केला आहे का की किती गाठी बांधल्या पाहिजेत. काहींना याबाबत माहिती असेल मात्र काहींना नाही. राखी बांधताना नेहमी राखीच्या तीन गाठी बांधल्या पाहिजेत. 

देवाशी आहे संबंध

राखी बांधताना मनगटावर गाठ बांधण्याला धार्मिक महत्त्व आहे. मनगटावर बांधल्या जाणाऱ्या तीन गाठींचा संबंध देवाशी असतो. म्हणजेच ब्रम्हा,विष्णू आणि महेश, प्रत्येक गाठ या तीन देवांना समर्पित आहे. त्यामुळेच या तीन गाठी शुभ मानल्या जातात. 

भावा-बहिणीसाठी आहे खास

असे मानले जाते की मनगटावर बांधल्या जाणाऱ्या गाठीचा संबंध भाऊ-बहिणीशी असतो. राखीची पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी असते. दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी असते. तर तिसरी गाठ ही भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी तसेच सुरक्षित राखण्यासाठी बांधली जाते. 

अधिक वाचा - वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे कांदा, जाणून घ्या फायदे

यावेळेस बांधा राखी

शास्त्रात भद्रकालात श्रावणी पर्व साजरा करण्यास निषेध केला आहे. अशातच रात्री ८.५० वाजता राखी बांधणे शुभ असते. दरम्यान, हिंदू मान्यतेप्रमाणे सूर्यास्तानंतर राखी बांधणे वर्ज्य अते. त्याचमुळे हा सण १२ ऑगस्टला साजरा केला जात आहे. १२ ऑगस्ट शुक्रवारी पोर्णिमा तिथीला सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपर्यंत आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी