Makar Sankranti ला का उडवले जातात पतंग? जाणून घ्या महत्त्व, कोणी केली होती सुरुवात

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jan 12, 2022 | 17:44 IST

मकर संक्रांतीला (makar sankrant) खूप खास महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे.

Why are kites flown on Makar Sankranti
मकर संक्रांतीला का उडवले जातात पतंग?जाणून घ्या महत्त्व  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पतंग उडवताना व्यक्तीचे शरीर सरळ सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येते.
  • भगवान राम यांनी सुरू केलेल्या या परंपरेला हिंदू धर्मात आजही पाळले होते.
  • थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा रुक्ष होते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी हा पतंग उडविण्यााचा खेळ खेळला जातो.

मुंबई: हिंदू संस्कृतीत (Hindu culture) मकर संक्रांतीला (makar sankrant) खूप खास महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग (Kite) उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. मकर संक्रांतीच्या दिवशी भारतातील अधिकांश भागात पतंग उडवले. या दिवशी पतंग उडवण्यामागे केवळ धार्मिक (Religious) कारणच नव्हे तर वैज्ञानिक कारणही आहे. 

खरे तर आपल्या प्रत्येक सणांना धार्मिक महत्त्व असले तरी त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. आता मकर संक्रातीला पतंग उडवण्याचे कारण जाणून घेतल्यानंतर तुम्ही सर्व अवाक व्हाल. तसं बघायला गेले तर तुमच्या आमच्यासाठी पतंग उडविणं हा साधा खेळ. कागदाचा पतंग आणि मांजा बाजारातून आणायचा. शेजा-या पाजा-यांचे पतंग गुल करायचे आणि मज्जा लुटायची बस्स. पण पतंग उडवण्यामागे एक कारणही आहे. संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. ऊनही फार कमी मिळते आणि आपसूकच थंडीमुळे स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा रुक्ष होते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी हा खेळ खेळला जातो.

विशेष म्हणजे मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली तर त्याचा शरीरराला फायदा होतो. त्वचेसाठी ही सूर्यकिरणे आवश्यक असतात आणि ती मिळावीत यासाठी हा खेळ खेळला जातो. यानिमित्ताने का होईना पतंग उडवण्यासाठी थंडीतून लोक घराबाहेर पडतात छतावर येतात. त्यामुळे शरीराला पुरेपुर ऊन मिळते. सूर्याची किरणे व्यक्तींसाठी एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात. थंडीच्या दिवसांत व्यक्तीच्या शरीरात कफाचे प्रमाण वाढते. यासोबतच त्वचाही कोरडी होते.

यावेळेस छतावर उभे राहून पतंग उडवल्याने यासमस्यांपासून सुटका मिळते. यासोबतच व्हिटामिन डीही योग्य प्रमाणात शरीरास प्राप्त होते. व्हिटामिन डी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे व्हिटामिन शरीरासाठी एका जीवदायिनीप्रमाणे काम करते.  पतंग उडवल्याने मनुष्याचा मेंदू नेहमी सक्रिय राहतो. यामुळे हात आणि मानेच्या मांसपेशीमध्ये लवचिकपणा येतो. यासोबतच मन आणि मेंदू प्रसन्न राहतो तसेच चांगल्या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. पतंग उडवताना डोळ्यांची एक्सरसाईजही होते. 

​पतंग उडविण्यामागे आहे एक कथा

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक आख्यायिका आहे. तमिळच्या तंदनान रामायणानुसार भगवान श्रीरामांनी मकरसंक्रांतीवर पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. असे म्हटले जाते की भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग थेट स्वर्गात पोचला. स्वर्गात पतंग इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला. त्याला पतंग खूप आवडला आणि तो त्याने आपल्याकडे ठेवला. जयंतच्या पत्नीने विचार केला की, ज्याचा हा पतंग आहे तो घायला नक्कीच येईल. तिकडे भगवान रामाने हनुमानजीला पतंग आणण्यासाठी पाठविले. हनुमानजींनी जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी भगवान रामला भेटण्याची इच्छा केली. ती म्हणाली की ती श्रीरामांच्या दर्शनानंतरच पतंग परत करेल. हनुमानजींनी भगवान रामाला संपूर्ण प्रसंग सांगितला. भगवान राम म्हणाले की ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानजीला पुन्हा हा आदेश देण्यासाठी पाठविले. जयंतच्या पत्नीला स्वर्गात जाऊन हनुमानजींनी भगवान रामाचा आदेश सांगितला. त्यानंतर त्यांनी पतंग परत केला.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी