Bell in Temple: मंदिरात जाऊन घंटी का वाजवतात? जाणून घ्या याचे कारण

आध्यात्म
Updated Jun 01, 2022 | 12:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bell in Temple: तुम्ही कधी विचार केलाय का घरात असलेल्या देव्हाऱ्यात अथवा मंदिरात घंटी का वाजवली जाते. यामागे कोणताही अंधविश्वास नाही तर खोल विज्ञान लपले आहे. 

bells in temple
Bell in Temple: मंदिरात जाऊन घंटी का वाजवतात?  
थोडं पण कामाचं
  • मंदिरात घंटी यासाठी वाजवली जाते यावर वैज्ञानिकांनी रिसर्च केला आहे.
  • बऱ्याच अभ्यासाअंती शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की घंटांचा आवाज सूक्ष्म मात्र दूरपर्यंत ऐकू जाणारा असतो.
  • या घंटा वाजल्याने कंपन निर्माण होते यामुळे वायुमंडळात तरंगणारे अनेक बारीक विषाणू तसेच सूक्ष्म जीव नष्ट होतात.

मुंबई: जेव्हा तुम्ही कोणत्याही मंदिरात(temple) जाता तेव्हा मंदिरात घंटा(bell in temple) बांधलेली तुम्ही पाहिली असेल. नकळतपणेही तुमचा हात आधी घंटेवर जातो. देवाच्या दर्शनापूर्वी मंदिराच्या सुरूवातीला बांधलेली घंटा वाजवली जाते. मात्र तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का की मंदिरात नेहमी घंटा का वाजवली जात असेल. ही केवळ एक परंपरा आहे म्हणून की यामागे वैज्ञानिका कारणही आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबत विस्ताराने सांगणार आहोत. why bell rang in temple, know the scientific reason behind that

अधिक वाचा - 'कल हम रहे न रहें कल... गाणे गात केकेनं घेतला जगाचा निरोप

विषाणू आणि सूक्ष्म जीवाणू होतात नष्ट

मंदिरात घंटी यासाठी वाजवली जाते यावर वैज्ञानिकांनी रिसर्च केला आहे. बऱ्याच अभ्यासाअंती शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला की घंटांचा आवाज सूक्ष्म मात्र दूरपर्यंत ऐकू जाणारा असतो. या घंटा वाजल्याने कंपन निर्माण होते यामुळे वायुमंडळात तरंगणारे अनेक बारीक विषाणू तसेच सूक्ष्म जीव नष्ट होतात. यामुळे पर्यावरण शुद्ध होते आणि लोक दीर्घकाळ फिट राहतात. 

७ सेकंदापर्यंत वाजते घंटा

संशोधनाअंती हे ही समोर आले आहे की मंदिरातील घंटेमधून निघणारा ध्वनी हा साधारणपण ७ सेकंद वाजत राहतो. त्याच्या या ध्वनी लहरीमुळे तन आणि मनाला शांती मिळते. यामुळे मनात सकारात्मक उर्जेचा  संचार होतो. सोबतच नकारात्मक प्रभआवही संपतात. मंदिरातील घंटानादाने मनात उत्साह आणि आनंद निर्माण होतो. 

अधिक वाचा - AC रात्रंदिवस चालू ठेवल्यावरही वीज बिल येईल कमी, पाहा कसे?

देवी-देवतांना संगीत आवडते

हिंदू धर्मात शास्त्रानुसार देवी-देवतांना संगीत अतिशय प्रिय आहे. डमरू, घंटा, शंख, वीणा यासारखी वाद्ये आपल्या देवी देवतांसोबत दिसतात. घंटा हे ही असे वाद्य आहे जे वाजवल्याने देवी-देवता प्रसन्न होतात. स्कंद पुराणाबाबत बोलायचे झाल्यास घंटेच्या ध्वनीतून ॐ'चा ध्वनी निर्माण होतो जो मन-मस्तिष्कसाठी फायदेशीर असतो.  ॐच्या उच्चाराने देवही प्रसन्न होतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी