भाऊबीजेच्या दिवशी बहीण का ओवाळते भावाला? कधीपासून ही सुरू झाली परंपरा

आध्यात्म
Updated Nov 16, 2020 | 14:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Bhaubij tradition: कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळते. मात्र ही परंपरा कशी सुरू झाली हे तुम्हाला माहीत आहे का?

bhaubij
भाऊबिजेच्या दिवशी बहीण का ओवाळते भावाला? 

थोडं पण कामाचं

  • यमराजाची बहिण यमुनेने भावाला ओवाळले होते
  • बहिण या दिवशी भावाला आपल्या हाताने पक्वान्न करून वाढते
  • यमुनाने आपल्या भावाकडे इतर बहिणींसाठी मागितले होते वरदान

मुंबई: भाऊबीजेच्या bhaubij) सण म्हणजे भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक होय. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते. तसेच आपल्या हातांनी बनवलेले पक्वान्न खाऊ घालते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पुराणांमध्ये उल्लेख आहे की सूर्य तनया जमुनाने आपला भाऊ यमराजाला भोजन करून केली होती. याच कारणामुळे याला यमद्वितीया असेही म्हणतात. याच कारणामुळे भाऊबीजेला यमराज तसेच यमुना पुजेला महत्त्व आहे. 

यंदा भाऊबीज १६ नोव्हेंबरला साजरी केली जात आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळते तसेच त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र तु्म्हाला याच्या परंपरेबद्दल माहीत आहे का? जाणून घ्या या परंपरेबद्दल

सूर्यदेवची पत्नी छायाच्या उदरातून यमराज तसेच यमुनाचा जन्म झाला होता. यमुनेचे यमराजवर खूप प्रेम होते. ती अनेकदा आपल्या भावाला आपल्या घरी मित्रांसह भोजन करण्याचे निमंत्रण देत असे. मात्र यमराज आपल्या कामात व्यस्त असल्याने भोजनाचे निमंत्रण टाळत असे. यातच कार्तिक मासाच्या शुक्ल पक्षातील एका दिवशी यमुनाने यमराजाला भोजनासाठी निमंत्रण दिले आणि यावेळी त्याला आपल्या घरी येण्याचे वचन दिले. 

यमराजने विचार केला ही मी तर प्राण घेणारा आहे. मला कोणीही आपल्या घरी बोलवत नाही मात्र जर माझी बहीण मला प्रेमाने बोलवत असेल तर तिचे आमंत्रण मला स्वीकारलेच पाहिजे. बहीणीच्या घरी येत असताना यमराजाने नरकमध्य असलेल्या जीवांना मुक्त केलेय. यमराजाला आपल्या घरी येताना पाहून यमुनाच्या आनंदाला पारावर उऱला नाही. 

यमुनाने स्नान करत भावाची पुजा केली आणि त्याला टिळा लावला. तसेच तिने बनवलेले पदार्थ त्याला खाऊ घातले. यमुनेने केलेले आदरातिथ्य पाहून यमराज प्रसन्न होत त्याने बहिणीला वर मागण्यास सांगितले. यमुनाने आपल्या भावाला दरवर्षी तिच्या घरी येण्यास सांगितले. 

तसेच माझ्याप्रमाणे ज्या बहिणी या दिवशी भावाचा आदर-सत्कार करतील त्यांना तुझ्यापासून कोणतीच भीती नसावी तसेच त्याला दीर्घायुष्य लाभावे. यमराजाने आपल्या बहिणीला वचन दिले की जी बहीण भावासाठी भाऊबीज करेल त्यांची रक्षा ते स्वत: करतील. या पौराणिक कथेनुसार दरवर्षी भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. तसेच त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी