गणपती बाप्पाला का म्हटलं जातं 'एकदंत', जाणून घ्या बाप्पाबद्दल या खास गोष्टी

आता २२ ऑगस्टला आपल्या घरात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. १० दिवस बाप्पाची पूजा-अर्चना केली जाते. पण आपल्याला बाप्पाशी निगडित महत्त्वाच्या गोष्टी माहिती आहेत का? जाणून घ्या याबाबत...

Ganesha
गणपती बाप्पाला का म्हटलं जातं 'एकदंत', जाणून घ्या खास गोष्ट 

थोडं पण कामाचं

  • जगभरात गणपती बाप्पाला अनेक नावांनी आपण ओळखतो.
  • बाप्पाचं एक नाव आहे एकदंत, जाणून घ्या त्यामागची कथा.
  • कसं झालं भगवान परशुराम आणि गणेशात युद्ध, काय होतं कारण पाहा...

Ganesh Chaturthi 2020: गणेशोत्सव आता अवघ्या एका दिवसावर आलेला आहे. यावर्षी २२ ऑगस्ट २०२० ला शनिवारी गणशे चतुर्थी (Ganesh Chaturthi 2020) आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या (Ganesh Festival 2020) दिवशी गणपती बाप्पाचं आपल्या घरी आगमन होतं. गणेश चतुर्थी म्हणजे गणेशाचा प्रकट दिन म्हटला जातो. जगभरात गणपती बाप्पाची वेगवेगळी नावं आहेत. भक्त बाप्पाला गजानन, विघ्नहर्ता, गणपती, एकदंत, सिद्धीविनायक, गणेशा आणि गौरी पुत्र या नावांनी संबोधतात. मात्र आपल्याला माहितीये का की, भगवान गणेशाच्या या वेगवेगळ्या नावांमागे कथा काय आहेत ते. (Story About Ekdant)

तर मग आज आपण जाणून घेऊया गणपती बाप्पाला एकदंत का म्हणतात, त्याबद्दल...

ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलं गेलं आहे की, एकदा भगवान परशुराम आपल्या इष्ट देवतेला म्हणजेच भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेले. त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते. ते देवी पार्वतीला श्री रामाची कथा ऐकवत होते. कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली होती की, कुणालाही गुहेत आत सोडू नये. सोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूलही दिलं होतं. 

जेव्हा भगवान परशुराम कैलाश पर्वतावर पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की, भगवान शंकर पूर्ण कैलासावर कुठेच नाहीयेत. फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभा आहे. ते आपल्या इष्ट देवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलास पर्वतावर फिरत होते. मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला. जिथं भगवान शंकर आणि देवी पार्वतीला श्री राम कथा ऐकवत होते. जेव्हा गणेशानं भगवान शंकराचा त्रिशूल रोखून परशुराम यांना गुहेत जाण्यापासून थांबवलं. तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले. 

त्यांनी गणेशाला आपला रस्त्या अडवू नकोस असं सांगितलं. नाहीतर युद्ध करण्याची चेतावनी दिली. गणपती बाप्पा मागे हटणारे नव्हते आणि त्यांनी परशुराम यांच्यासोबत युद्ध केलं. या युद्धादरम्यान गणपती बाप्पाचा एक दात तुटला. त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळालं. नंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीनं जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांनी परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं. 

तर अशाप्रकारे गणेशाला एकदंत नाव मिळालं. गणपती बाप्पाच्या प्रत्येक नावामागे अशाप्रकारची एक ना एक कथा आहे. आता या गणेशोत्सवानिमित्त जाणून घ्याल बाप्पाच्या प्रत्येक नावाची कथा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी