Devshayani Ekadashi 2022: देवशयनी एकादशी पासून ४ महिने का झोपी जातात भगवान विष्णू; जाणून घ्या त्याचे महत्त्व

आध्यात्म
Updated Jun 18, 2022 | 08:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Devshayani Ekadashi 2022 | हिंदू पंचागानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथीमध्ये (शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष) येतात. तसं तर वर्षभरात एकूण २४ एकादशी तिथी आणि अधिमासात २६ एकादशी तिथी असतात.

Why do Lord Vishnu sleeps for 4 months from Devshayani Ekadashi, Know its importance
... म्हणून देवशयनी एकादशी पासून ४ महिने झोपतात भगवान विष्णू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू पंचागानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथीमध्ये येतात.
  • शास्त्रानुसार भगवान विष्णू झोपी गेल्यानंतर संपूर्ण चार महिने लग्न, विवाह, मुंडन, अशा सर्व १६ विधी थांबवल्या जातात.
  • यावेळी देवशयनी एकादशी तिथी ९ जुलै २०२२ रोजी दुपारी ४.३९ वाजता सुरू होत आहे.

Devshayani Ekadashi 2022 Chaturmas Importance । मुंबई : हिंदू पंचागानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथीमध्ये (शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष) येतात. तसं तर वर्षभरात एकूण २४ एकादशी तिथी आणि अधिमासात २६ एकादशी तिथी असतात. परंतु सर्व एकादशींमध्ये आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व अधिक वाढते. याला देवशयनी एकादशी किंवा सौभाग्यदायीनी एकादशी असे देखील म्हणतात. यावेळी देवशयनी एकादशी १० जुलै २०२२ रोजी येत आहे. या एकादशीचे धार्मिक महत्त्व देखील विशेष आहे कारण या एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू चार महिने झोपी जातात. चार महिन्यांनंतर देवोत्थान किंवा देवूठाणी एकादशीच्या दिवशी भगवान पुन्हा झोपेतून जागे होतात. (Why do Lord Vishnu sleeps for 4 months from Devshayani Ekadashi, Know its importance). 

अधिक वाचा : ५० घोडे आणि १ हजार माणसांना मागे टाकत जिंकली ३५ किमीची शर्यत

शास्त्रानुसार भगवान विष्णू झोपी गेल्यानंतर संपूर्ण चार महिने लग्न, विवाह, मुंडन, अशा सर्व १६ विधी थांबवल्या जातात. भगवान विष्णू देवोत्थान एकादशीला उठल्यानंतर सर्व कार्य पुन्हा सुरू होतात अशी मान्यता आहे. आषाढातील शुक्ल पक्षाच्या ११ व्या दिवसापासून ते कार्तिकच्या शुक्ल पक्षाच्या ११ व्या दिवसापर्यंत हे चार महिने शास्त्रात चातुर्मास किंवा चौमास म्हणून ओळखले जातात. चला तर मग जाणून घेऊया चातुर्मास म्हणजे काय आणि भगवान विष्णू चार महिने का झोपतात.

चातुर्मासचे महत्त्व

  1. असे म्हणतात की भगवान विष्णू जितके दिवस झोपलेले असतात तितके दिवस त्यांचा अवतार समुद्रात संजीवनी वनौषधी बनवतो, ज्यामुळे पृथ्वीची सुपीकता वाढत असते.
  2. चातुर्मास किंवा चौमास दरम्यान प्रवास करणे टाळा.
  3. चातुर्मासात मांगलिक कार्यांवर बंदी असली तरी पूजा, यज्ञ, तीर्थयात्रा अशी कार्ये केली जातात.
  4. आषाढातील शुक्ल पक्षाच्या ११ व्या दिवसापासून कार्तिक शुक्ल पक्षाच्या ११ व्या दिवसापर्यंत भगवान विष्णू गाढ झोपेत असतात.
  5. देवउठनी एकादशीला देवाने लक्ष्मीशी विवाह केला असे म्हणतात. त्यामुळे या दिवसापासून सर्व शुभ आणि शुभ कार्याला सुरुवात होते.

यावेळी देवशयनी एकादशी तिथी ९ जुलै २०२२ रोजी दुपारी ४.३९ वाजता सुरू होत असून एकादशी तिथी १० जुलै रोजी दुपारी २.१३ वाजता समाप्त होईल. उदया तिथीनुसार १० जुलै रोजी देवशयनी एकादशीचे व्रत आणि पूजा केली जाईल.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी