Garuda Purana:घरात कोणाच्या मृत्यूनंतर का पेटवली जात नाही चूल

आध्यात्म
Updated Jul 04, 2022 | 12:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Death Rituals of Hindu: हिंदू धर्मातील लोक कुटुंबातील कोणाच्या मृत्यूनंतर काही काळापर्यंत घरात चूल पेटवली जात नाही. याशिवाय अंत्यसंस्कारानंतर संपूर्ण घराची साफसफाई केली जाते. 

death
घरात कोणाच्या मृत्यूनंतर का पेटवली जात नाही चूल 
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात १६ संस्कार सांगितले आहेत यात गर्भ संस्कारापासून ते मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या अंत्य संस्काराचा समावेश होतो.
  • गरुड पुराणात अंत्य संस्कारआणि मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवेशाविषयी सांगितले आहे
  • यामुळेच घरात कोणाच्या मृत्यूनंतर गरूड पुराण वाचले जाते. 

मुंबई: प्रत्येक धर्मात मृत्यू आणि त्यानंतर केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराबाबत काही नियम आणि परंपरा देण्यात आल्या आहेत. गरूण पुराणात(garud puran) अंत्यसंस्कार(final rituals) आणि त्यानंतर मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. यांचे पालन करणे गरजेचे असते. यातच एक म्हणजे घरातील कोणाचा मृत्यू झाल्यास काही दिवस चूल पेटवली जात नाही. याशिवाय मृत व्यक्तीचे कुटुंब अंत्यसंस्कारापासून ते तेराव्यापर्यंत तसेच अनेक क्रियाविधी केले जातात. why food not coocked after death in family

अधिक वाचा - मोठा धक्का, आणखी एका आमदारानं सोडली उद्धव ठाकरेंची साथ

१६ संस्कारांपैकी शेवटचा संस्कार मृत्यू

हिंदू धर्मात १६ संस्कार सांगितले आहेत यात गर्भ संस्कारापासून ते मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या अंत्य संस्काराचा समावेश होतो. गरुड पुराणात अंत्य संस्कारआणि मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवेशाविषयी सांगितले आहे. यामुळेच घरात कोणाच्या मृत्यूनंतर गरूड पुराण वाचले जाते. 

यामुळेच मृत्यूनंर घरात नाही पेटवली जात चूल

गरुड पुराणात सांगितले गेले आहे की कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत घरात चूल पेटवली जात नाही. अंत्यसंस्कारानंतर जेव्हा घरातील सर्वजण स्नान करतात त्यानंतर जेवण शिजवले जाते. अनेक घरांमध्ये तर ३ दिवसांनी घराची साफसफाई होईपर्यंत घरात जेवण केले जात नाही. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे आहेत. 

अधिक वाचा - आठवड्याच्या दिवसाप्रमाणे परिधान करा कपडे, होईल फायदा

संसर्गापासून होतो बचाव

वैज्ञानिक दृष्टोकोनातून पाहिल्या असल्यास मृत व्यक्तीच्या शरीरात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात अशातच घरात जर मृतदेह ठेवला असेल तर या दरम्यान घरातील लोकांकडून जेवण केल्यास संसर्गाचा धोका असतो. यामुळे अंत्यसंस्कार करून आल्यानंतर साफ कपडे घातल्यानंतरच जेवण केले पाहिजे आणि खाल्ले पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी