मुंबई: भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला(chaturthi) गणपती बाप्पा सगळ्यांच्यां घरात विराजमान होतात. दरम्ान, १० दिवसांनी या गणपती बाप्पाचे(ganpati bappa) विसर्जन केले. काही ठिकाणी दीड दिवस तर काही ठिकाणी पाच दिवसांनीही गणपतीचे विसर्जन केले जाते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. याशिवा देशातील अनेक राज्यांमध्ये हा गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की गणपती १० दिवसच का विराजमान असतात. १० दिवसांनी गणपतीचे विसर्जन करण्याचे एक खास कारण आहे. याचा संबंध महाभारताशी संबंधित आहे. why ganpati visarjan done in 10 days
अधिक वाचा - सोने-चादी घसरले, रुपयातील घसरणीबरोबरच जागतिक घटकांचा प्रभाव
गणपतीच्या शरीरावर जमा झाली होती धूळ-माती
असे म्हटले जाते की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. सोबतच पौराणिक कथांमध्ये असाही उल्लेख आहे की गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले होते. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना करण्यासाठी गणपतीला लिहिण्याची विनंती केली आणि गणपतीला सांगितले होते की लिहिण्यास सुरूवात केल्यानंतर पेन थांबले नाही पाहिजे. जर पेन लिहायचे थांबले लिहिणे बंद करावे लागेल. तेव्हा महर्षी वेदव्यास यांनी सांगिते की देवा तुम्ही सगळ्यात विद्वानांपेक्षा थोर आहात आणि मी सामान्य ऋषी जर श्लोकांमध्ये काही चूक झाली तर लिपिबद्ध करताना ती चूक सुधाराल. या पद्धतीने महाभारताचे लिखाण सुरू आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा महााभारताचे लेखन पूर्ण झाले तेव्हा गणपतीचे शरीर जड झाले होत. अजिबात न हलल्यामुळे त्याच्या शरीरावर धूळ माती जमली होती. तेव्हा गणपतीनने सरस्वती नदीमध्ये स्थान करत आपले शरीर साफ केले होते. म्हणूनच गणपतीची स्थापना १० दिवस केली जाते आणि त्यानंतर गणपतीचे विसर्जन होते.
अधिक वाचा - आत्महत्येत देशात महाराष्ट्राचा क्रमांक प्रथम
मनावरील हटवा मळ
गणेशोत्सवाला अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर १० दिवस हे आपल्याला संयमी राहण्यासाठी तसेच आपल्या मनावरील विचारांची धूळ बाजूला सारण्याचे पर्व आहे.