यम द्वितीयच्या दिवशी का साजरा केली जाते भाऊबीज? काय आहे पौराणिक इतिहास जाणून घ्या

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 05, 2021 | 18:14 IST

दिवाळी (Diwali) भारतातील सर्वात मोठा सण आहे. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून (Dhantrayodashi) होते आणि शेवटच्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. या १५ दिवस आधी आणि नंतर अनेक सण असले तरी. पण या ५ दिवसांत भाऊबीज हा महत्त्वाचा सण आहे.

Why is Bhaubij celebrated on the day of Yama Dwitiya
यम द्वितीयच्या दिवशी का साजरा केली जाते भाऊबीज?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरा केला जातो.
  • पौराणिक कथेनुसार, एकदा यमदेव त्यांची बहीण यमुना किंवा यमी यांना त्यांच्या घरी भेटायला गेले होते.
  • ओवाळणी करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १:१० ते ३:२१ पर्यंत आहे.

नवी दिल्ली: दिवाळी (Diwali) भारतातील सर्वात मोठा सण आहे. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून (Dhantrayodashi) होते आणि शेवटच्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. या १५ दिवस आधी आणि नंतर अनेक सण असले तरी. पण या ५ दिवसांत भाऊबीज हा महत्त्वाचा सण आहे.

भाऊबीजचा दिवस कसा साजरा केला जातो

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. अनेक ठिकाणी भाऊबीज  असेही म्हणतात. भाऊबीजच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला मिठाई खाऊ घालतात आणि तिलक लावून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात. तर भाऊ बहिणीच्या घरी जाऊन बहिणींना भेटवस्तू देतो.

भाऊबीज यम द्वितीयेलाच का साजरा केला जातो? 

पौराणिक कथेनुसार, एकदा यमदेव त्यांची बहीण यमुना किंवा यमी यांना त्यांच्या घरी भेटायला गेले. भाऊ घरी आल्याचे पाहून बहिणीने आरती करून भावाचे स्वागत केले. यमदेवाच्या कपाळावर तिलक लावून बहिणीने त्यांना मिठाई खाऊ घातली आणि मग स्वादिष्ट भोजन केले. आपल्या बहिणीच्या या स्वागताने यमराज खूप आनंदित झाले आणि भेट म्हणून त्यांनी सर्व बंधू-भगिनींना आशीर्वाद दिला आणि घोषित केले की, यादिवशी जो कोणी आपल्या बहिणीला भेटायला जातो आणि बहिणी आरती आणि तिलक लावून भाऊचे स्वागत करतील, तेव्हा भाऊवरील सर्व प्रकारचे दोष दूर होतील. भाऊचे वाईच शक्तीपासून रक्षण होईल. त्यामुळेच या दिवशी भाऊबीज साजरा केला जातो.

यावर्षी ओवाळणी करण्यासाठी शुभ मुहूर्त

यावर्षी भाऊ दूज ६ नोव्हेंबर रोजी आहे आणि या दिवशी आपल्या भावांना ओवाळणी करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १:१० ते ३:२१ पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर ओवाळणी करणे खूप शुभ असेल. परंतु काही कारणास्तव तुम्हाला यावेळी ओवाळणी लावता येत नसेल, तर ६ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजेपूर्वी कधीही तुमच्या भावाची ओळवणी  करता येईल. यावर्षी द्वितीया तिथी 5 नोव्हेंबर रोजी रात्री 11.14 वाजता सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी रात्री 07:44 पर्यंत राहील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी