Astrology | मुंबई : भारतात शकुन-अपशकुन याबाबतच्या समजुती वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. असे मानले जाते की सर्व प्राणी आणि पक्षी भविष्यातील घटनांबद्दल सूचित करत असतात. यापैकीच एक म्हणजे 'मांजर आडवे जाणे'. आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत की मांजर जेव्हा रस्ता ओलांडते तेव्हा लोक थांबतात. कारण मांजर आडवे जाणे हे अशुभ मानले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे धार्मिक ग्रंथांमध्ये मांजरीला संपत्ती आणि वैभवाची देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीची सवारी म्हणून दाखवण्यात आले आहे. (Why is it considered inauspicious for a cat crossing while crossing the road?).
दरम्यान, कोणत्याही व्यक्तीला कितीही महत्त्वाचे काम असले तरी मांजर आडवे गेले की ती संबंधित व्यक्ती आपला मार्ग बदलते अथवा जोपर्यंत कोणीतरी रस्ता ओलांडत नाही तोपर्यंत तिथेच थांबते. जर तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी बाहेर जात असाल आणि मांजर रस्ता ओलांडत असेल तर तुम्ही थुंकून पुढे जाता. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का असे करण्यामागचे कारण काय आहे. मांजरीचा मार्ग ओलांडणे खरोखरच वाईट आहे का?
अधिक वाचा : कोरोना संकट; राज्यात परत होऊ शकते मास्कची सक्ती
खर म्हणजे ज्योतिषशास्त्रात राहू हा अशुभ ग्रह मानला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्रात मांजरीचे राहूची सवारी असेही वर्णन केले आहे. राहू हा असा ग्रह आहे ज्याच्या अशुभ प्रभावामुळे जीवनात नकारात्मकता राहते आणि अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे राहूची स्वारी असल्याने मांजर देखील अशुभ मानली जाते. असे मानले जाते की जर मांजरीने रस्ता ओलांडला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते यशस्वी होणार नाही आणि त्याच वेळी अपघाताची शक्यता देखील वाढते. त्यामुळेच अपघाताच्या भीतीने लोक अजूनही मांजराच्या वाटेवरच राहतात.
हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो की मांजर आडवे जाणे हे खरच शुभ असते की अशुभ? याचे उत्तर नाही असे आहे. कारण शास्त्रामध्ये मांजर डावीकडून रस्ता ओलांडून उजवीकडे गेल्यावर मांजर आडवे जाणे हे अशुभ मानले जाते. याशिवाय इतर परिस्थितीत मांजर आडवे जाणे अशुभ नसते.
मांजर आडवे गेल्याने अशा स्थितीत काय करावे असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. जेव्हा मांजर रस्ता ओलांडते तेव्हा लोक थांबतात आणि दुसऱ्या व्यक्तीची वाट पाहत असतात. मात्र जर रस्त्यावर आपल्याशिवाय कोणीच नसेल दुसरा कोणीच रस्त्यावरून ये-जा करत नसेल अशा परिस्थितीत तुम्ही चप्पल फेकून मगच रस्ता ओलांडता. याशिवाय काही लोक थुंकूनही रस्ता ओलांडतात. लक्षणीय बाब म्हणजे मांजर आडवे गेल्यावर प्रत्येक सभ्यता आणि संस्कृतीत वेगवेगळ्या समजुती आहेत.