Cremation in Hinduism: या जगात कोणीच अमर नसून पृथ्वीवर (earth) जन्म (birth) घेतलेल्या कोणत्याही जीवाचा मृत्यू अटल आहे. प्रत्येक माणसाला कधी ना कधी मरावेच लागते. ज्या प्रमाणे जन्म झाल्यानंतर काही संस्कार (rite) असतात त्याच प्रमाणे माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्या- त्या धर्मानुसार (religion) संस्कार केले जातात. अंत्यसंस्कार (funeral) हा हिंदू धर्मातील (Hinduism) मुख्य संस्कारांपैकी एक मानला जातो, जो संपूर्ण विधींनी पूर्ण केला जातो. हिंदू धर्मात मृत शरीराला अग्नीदाह करण्याची परंपरा आहे, म्हणजे मृत्यूनंतर मृतदेह जाळला जातो. यासोबतच अंत्यसंस्कारासाठी काही नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. गरुड पुराणात अशा काही विधानांचा उल्लेख आहे ज्यात सूर्यास्तानंतर एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार का केले जात नाहीत, तसेच मृत शरीराला एकटे का सोडले जात नाही हे सांगितले आहे.
जर एखाद्या व्यक्तीचा सूर्यास्तानंतर मृत्यू झाला तर त्याचे अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी सकाळीच केले जातात. या दरम्यान मृतदेह रात्रभर जमिनीवर ठेवला जातो आणि कोणी ना कोणी नक्कीच रात्रभर त्याच्यासोबत बसतो. याचे कारण गरुड पुराणात सांगितले आहे. प्रथमतः सूर्यास्तानंतर कोणावर अंत्यसंस्कार केले तर त्या व्यक्तीची अधोगती होते आणि त्याला मोक्ष मिळत नाही. अशी आत्मा पिशाच किंवा असुर योनीत पुनर्जन्म घेतो.
Read Also : 'हर घर तिरंगा' मोहिमेचे व्हिडिओ-थीम साँग होणार लाँच
अंत्यसंस्कारासाठी योग्य वेळ निवडणे देखील आवश्यक मानले गेले आहे. पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा अंतिम संस्कार हा कालावधी संपल्यानंतरच केला जातो. या दरम्यान पंचक संपेपर्यंत कुणाला तरी मृतदेहासोबत बसावे लागते. पंचक काळात एखाद्यावर अंत्यसंस्कार केल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर पाच जणांचाही मृत्यू होऊ शकतो. यासाठी एक उपायही सांगितला आहे, त्यानुसार मृत शरीरासोबत बेसन किंवा सुक्या गवताच्या ५ पुतळ्यांवरही पूर्ण नियमाने अंत्यसंस्कार केले जातात.
रात्रभर मृतदेहासोबत बसण्याचे कारणही गरुड पुराणात सांगितले आहे. यानुसार, जर मृत शरीर एकटे सोडले तर रात्रीच्या वेळी वाईट आत्मा त्यात प्रवेश करू शकतो आणि त्या शरीराद्वारे काही वाईट काम करू शकतो. यामुळेच रात्रीच्या वेळी मृतदेहाजवळ कोणीतरी नक्कीच बसते आणि ती जागा स्वच्छ ठेवली जाते. याशिवाय, तेथे अगरबत्ती किंवा दिवा लावला जातो जेणेकरून अग्निच्या पवित्र प्रकाशात कोणताही वाईट आत्मा मृत शरीरात प्रवेश करू नये.
Read Also : शेवटच्या षटकातील दोन चेंडूंतच वेस्ट इंडिजनं मिळवला विजय
याशिवाय कुत्रा किंवा इतर कोणत्याही प्राण्यापासून मृतदेहाची हानी होऊ नये, यासाठी तो एकटा सोडला जात नाही. मांजर, कुत्रा वा इतर प्राणी जमिनीवर ठेवलेल्या मृतदेहाला इजा करू शकतात. जर एखाद्या मृतदेहाबाबत असे घडले म्हणजे कोणत्या प्राण्याने चावा घेतला किंवा मृतदेहाचे लचके तोडलं तर मृत व्यक्तीला यमलोकातही अशाच अत्याचारांना सामोरे जावे लागू शकते.
Read Also : ड्रोन हल्ल्यात दहशतवादी अल-जवाहिरी ठार; बायडेन झाले खूश
हिंदू धर्मात अशीही एक समजूत आहे की मृतदेहाचे अंतिम संस्कार मृत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगीच करतात. जर मृत व्यक्तीचे वंश त्यांच्यापासून दूर असतील तर त्यांच्या आगमनापर्यंत त्यांची प्रतीक्षा केली जाते. अशा परिस्थितीत काही वेळा मृतदेह रात्रभर ठेवावा लागतो. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार पुत्राच्या हाताने करण्यात यावे, अशी मान्यता आहे. मुलाने मृत्य व्यक्तीला अग्नीदाह दिला तर मृत्य व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. अन्यथा आत्मा पुनर्जन्म किंवा मोक्षाच्या शोधात भटकत राहतो.