Tulsi Puja Niyam: तुळशीला (Tulsi) हिंदू धर्मात (Hinduism)अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळेच जवळपास प्रत्येक घरात तुळशीचे रोप नक्कीच असते. याला जेवढे धार्मिक (religious) महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व आयुर्वेदातही ( Ayurved)आहे. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशी मान्यता आहे की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा (Lord Vishnu) आशीर्वाद राहतो. धार्मिक दृष्टीकोनातून तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. दरम्यान तुळशीविषयी अनेक नियम आहेत. तुळशी तोडणे, जल अर्पण करणे, पूजा करण्याचे अनेक नियम धार्मिक ग्रंथांमध्येही आढळतात. तुळशीच्या रोपांना जल अर्पण केल्याने विशेष लाभ होत असतात, मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी देऊ नये. यामागे धार्मिक कारण काय आहे ते जाणून घेऊया. (Why not offering water to Tulsi on Ekadashi and Sunday? Do you know why?)
अधिक वाचा :
तुळशीला नियमित जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते, परंतु शास्त्रानुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये. पौराणिक मान्यतेनुसार, तुळशीमाता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जात असतो, त्यामुळे या दिवशी पाणी टाकू नये. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने नकारात्मक शक्तींचा निवास होतो.
अधिक वाचा :
शास्त्रानुसार एकादशीला तुळशीची पानं तोडू नयेत आणि या दिवशी तुळशीला पाणीही अर्पण करू नये. देवूठाणी एकादशीच्या दिवशी तुळशी माताचा विवाह भगवान शाळीग्रामसोबत करण्याची परंपरा आहे. तुळशी माता प्रत्येक एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करते. त्यामुळे एकादशीलाही तुळशीला जल अर्पण करण्यास मनाई असते, असे मानले जाते.
शिव कुटुंब वगळून तुळशीचा उपयोग जवळजवळ प्रत्येक हिंदू देवतांच्या पूजेत केला जातो. तुलशीला जल अर्पण करण्यापूर्व कोणत्याही प्रकारचे अन्न ग्रहण करु नये. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण करणे उत्तम मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करताना न शिवलेले कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो. आंघोळ केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने तुळशीला जल अर्पण करू नये. तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते, त्यामुळे तुळशीची पाने तोडण्यापूर्वी हात जोडून त्यांची परवानगी घेणे फार महत्वाचे आहे. तुळशीची पाने चाकू, सुरी किंवा नखांच्या मदतीने तोडू नयेत.