Coconut: या कारणांमुळे महिला शुभ कार्यात फोडत नाहीत नारळ

आध्यात्म
Updated May 13, 2022 | 20:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

Importance of Coconut: हिंदू धर्मात पुजा करण्यापासून ते शुभ अथवा मंगल कार्याच्या सुरूवातीस नारळ फोडण्याची प्रथा आहे. नारळाशिवाय कोणतीही पुजा अपुरी मानली जाते. मात्र शुभ कार्यात महिलांना नारळ फोडण्यास मनाई असते. 

coconut
Coconut: या कारणांमुळे महिला शुभ कार्यात फोडत नाहीत नारळ 
थोडं पण कामाचं
  • बीजरूपी फळ असते नारळ
  • नारळ आणि श्रीफळामध्ये त्रिदेवांचा वास
  • नारळाशिवाय कोणतीही पुजा आहे अपूर्ण

मुंबई: हिंदू धर्मात नारळाला(coconut) शुभ मानले जाते. यासाठी पुजा तसेच अनेक धार्मिक कार्यांची(tradition) सुरूवात नारळ फोडून केली जाते. नारळाशिवाय विशेष पुजा-पाठ, हवन तसेच अनेक शुभ कार्यांना अर्धवट मानले जाते. शास्त्रातही नारळाला श्रीफळ(shrifal) म्हटले गेले आहे. यातील पाणी हे अमृतासमान मानले जाते. मात्र पुजेसंबंधी कार्यामध्ये महिलांना नारळ फोडण्यास मनाई असते. असे का असते. why womens cant break coconut in religious work

अधिक वाचा - IPL 2022:पहिल्यांदा IPL 2022मध्ये झाला असा लाजिरवाणा रेकॉर्ड

नारळामध्ये असतो त्रिदेवाचा वास

संस्कृतमध्ये नारळास श्रीफळ म्हटले जाते. खरंतर, नारळ माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे फळ असते म्हणूनच यास श्रीफळ म्हटले जाते. अशी मान्यता आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा ते स्वर्गातून आपल्यासोबत लक्ष्मी माता, नारळाचे झाड आणि कामधेनु या तीन गोष्टी घेऊन आले होते. यासाठी नारळाला श्रीफळ म्हटले जाते. नारळामध्ये त्रिदेव म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. याच कारणामुळे हिंदू धर्मात विविध धार्मिक कार्यामध्य नारळ चढवण्याचे महत्त्व आहे. 

यासाठी महिलांना नारळ फोडणे असते वर्ज्य

पुजा-पाठ अथवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ महिला फोडू शकत नाहीत. ही परंपरा अनेक युगांपासून चालत आली आहे. शास्त्रात यास अशुभ मानले जाते. ज्योतिषानुसार महिला पुजा-पाठसारख्या कार्यांमध्ये नारळ चढवू शकतात मात्र ते फोडू शकत नाही. याच कारणमुळे नारळाला बीजरूप मानले गेले आहे. स्त्री बीज रूपात एका बाळाला जन्म देते. यासाठी नारळ अथवा श्रीफळ फोडण्यास स्त्रियांना मनाई केली जाते. जर एखादी महिला नारळ फोडते तर तिला गर्भधारणेसाठी समस्या होते. तिला संतानसुख मिळण्यास त्रास होतो. याच कारणामुळे महिलांना नारळ फोडण्यास दिला जात नाही. 

अधिक वाचा - एलआयसीच्या आयपीओचे किती शेअर्स आणि कधी मिळणार, पाहा...

या कार्यांमध्ये नारळाचे असते विशेष महत्त्व

हिंदू धर्माशी जोडलेल्या अनेक परंपरा आणि रिती-रिवाजामध्ये नारळाचे विशेष महत्त्व आहे. विवाह ठरल्यानंतर तिलक करताना, जनेऊ संस्कार, हळदीसारख्या समारंभात नारळ भेटस्वरूप दिले जाते. याशिवाय कलश स्थापना, यज्ञ, होमसारख्या धार्मिक कार्यांमध्येही नारळाचा वापर केला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी