Astro Tips In Marathi | मुंबई : जीवनात नावलौकिक आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक खूप मेहनत करतात. असे असूनही अनेक लोकांना यश मिळत नाही. यामागे ग्रहांचे कमजोर होणे हे कारण आहे. त्यामुळे आपण कितीही कष्ट केले तरी त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. कोणतेही करिअर पूर्णपणे एका ग्रहणाने बनलेले नसते. जेव्हा अनेक ग्रहांचे सहकार्य लाभते तेव्हाच लोकांना प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळत असतो. त्यामुळे सर्व ग्रहांना प्रसन्न करणे आवश्यक आहे. चला तर म जाणून घेऊया ग्रहांना प्रसन्न करण्याचे सोपे उपाय. (With these simple measures the planets will be happy).
अधिक वाचा : मदरशात 11 वर्षाच्या मुलावर अत्याचार
सूर्य - सूर्यदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी नेहमी तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे. तसेच वेलचीच्या सेवनाने देखील सूर्यदेव प्रसन्न होतात. रविवारी उपवास करून लाल वस्त्र धारण केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते.
चंद्र - क्रीमच्या रंगाचे कपडे परिधान केल्याने चंद्राचा शुभ प्रभाव वाढतो. चांदीच्या वापराने चंद्र देवतेचा आशिर्वादही मिळतो. तसेच नेहमी पांढऱ्या रंगाचा रूमाल खिशात ठेवावा.
मंगळ - मंगळ ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करावा. कपाळावर लाल टिक्का लावल्याने मंगळ ग्रहाचा आशिर्वाद मिळतो. ढळक लाल वस्त्र धारण केल्याने देखील मंगळ ग्रह प्रसन्न होतो.
बुध - बुध ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी हिरवे वस्त्र परिधान करावे. तसेच हिरवा रुमाल किंवा पर्स सोबत ठेवावी. जर बुध प्रभावी असेल तर व्यक्ती आपल्या बुद्धीच्या बळावर स्वतःला स्थापित करते.
बृहस्पति - गुरू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र परिधान करावे. दर गुरुवारी केशर आणि हळदीचा टिक्का लावावा.
शुक्र - शुक्रदेवाचा आशिर्वाद घेण्यासाठी चांदीचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत. तुमच्या खिशात चमकदार पांढरा रंगाचा रुमाल ठेवा. हिरे आणि प्लॅटिनमचे दागिने परिधान केल्याने शुक्राचा आशिर्वाद मिळतो.
शनि - शनीला प्रसन्न करण्यासाठी काळा रुमाल जवळ ठेवा. काळ्या रंगाच्या वस्तू दान करा. एखाद्या गरीब व्यक्तीला शूज आणि चप्पल खरेदी करा.
राहू - राहूला प्रसन्न करण्यासाठी राखाडी रंगाचे कपडे घालावेत. राहूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कुत्र्यांची सेवा करणे देखील प्रभावी आहे.
केतू - तुमच्या खिशात चमकदार रंगाचा रुमाल ठेवा. लाल रंगाचा कलवा हाताच्या मनगटावर धारण करावा. केतू हे केल्याने प्रसन्न होतो.