Navratri 2020: नवरात्रीमध्ये देशातील मंदिरांच्या आहेत अद्भुत परंपरा, वाचून व्हाल आश्चर्यचकित

आध्यात्म
Updated Oct 16, 2020 | 13:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navratri 2020: नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चना होते, पण आम्ही आपल्याला अशा काही मंदिरांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या परंपरा ऐकून आपण चकित होऊन जाल. ही दोन्ही देवीमंदिरे बिहार राज्यात आहेत.

Navratri 2020
नवरात्रीमध्ये देशातील मंदिरांच्या आहेत अद्भुत परंपरा, वाचून व्हाल आश्चर्यचकित 

थोडं पण कामाचं

  • देवीच्या मंदिरातील अशा परंपरा ज्या आजही करतात चकित
  • देवीच्या या मंदिरांमध्ये नवरात्रीत महिलांना प्रवेश असतो बंद
  • बिहारच्या या मंदिरात दिला जात नाही पशूबळी

Navratri 2020: नवरात्रीत (Navratri) देवीच्या मंदिरांमध्ये पूजाअर्चना करण्याला विशेष महत्व असते. मंदिरात केल्या गेलेल्या पूजेची शुद्धता अधिक असते. देवीच्या मंदिरांमध्ये महिलांना पूजेचा विशेष अधिकार मिळतो, पण बिहारमध्ये (Bihar) देवीचे एक मंदिर (Devi temple) असेही आहे जिथे महिलांना (women) प्रवेश करण्याची परवानगी नाही (no entry). इथे महिला मंदिराच्या बाहेरूनच देवीला नमस्कार करतात. तर आणखी एक मंदिर असे आहे जिथे देवीची पूजा (worship of Goddess) करण्याची परंपरा अनोखी (wondrous tradition) आहे. आज आम्ही आपल्याला बिहारच्या या दोन मंदिरांबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.

देवीच्या या मंदिरात आहे रक्तहीन बळीची परंपरा

बिहारच्या मुंडेश्वरी धाम मंदिरात नवरात्रीत विशेष पूजा आयोजित केली जाते. इथे एक अनोखी परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. ही परंपरा रक्तहीन बळीची आहे. देवीच्या मंदिरांमध्ये पशूबळी दिला जातो, पण बिहारच्या कैमूर जिल्ह्यातल्या भगवानपुरच्या पवरा डोंगरावरील देवी मुंडेश्वरीच्या या मंदिरात पशुबळी दिला जात नाही. या अतिप्राचीन मंदिराचा समावेश ५१ शक्तिपीठांमध्ये आहे.

बकऱ्यामध्ये येते दिव्य शक्ती

देवी मुंडेश्वरीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की जेव्हा देवीला बकरा अर्पण केला जातो आणि इथले पुजारी त्या बकऱ्याला देवीच्या पायांशी ठेवतात, तेव्हा त्याच्यात एक दिव्य शक्ती येते. असे मानले जाते की बकऱ्याच्या अंगावर देवीच्या पायांशी ठेवलेल्या अक्षता घालताच तो बेशुद्ध होऊन देवीच्या चरणांशी पडतो. काही वेळाने पुजारी जेव्हा दुसऱ्यांदा अक्षता त्याच्यावर टाकतात, तेव्हा तो उठून उभा राहतो. त्यानंतर हा बकरा पुन्हा भक्तांच्या ताब्यात दिला जातो. ही परंपरा चकित करणारी आहे.

नवरात्रीत महिला या देवी मंदिरात जाऊ शकत नाहीत

महाराष्ट्राच्या शनीशिंगणापूर मंदिरात महिलांना पूजा करण्याचा अधिकार मिळाला आहे, पण बिहारच्या एका गावात एक देवी मंदिर असे आहे जिथे महिलांना नवरात्रीच्या काळात देवीची पूजा करण्याचा अधिकार नाही. हा अधिकार एका परंपरेसारखा मानला जातो. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात पावापुरीमध्ये घासरावा गाव आहे. या गावात देवीचे आशापुरी मंदिर आहे. इथे दुर्गादेवीची पूजा होते आणि सर्वांना पूजेचा अधिकार आहे, पण नवरात्रीच्या वेळची ही परंपरा इथे वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. या काळात महिलांना या मंदिरात प्रवेश वर्ज्य आहे. महिला देवीला मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करतात आणि परत फिरतात. याबाबत मंदिराच्या व्यवस्थानपाचे म्हणणे आहे की नवरात्रीच्या काळात मंदिरात तांत्रिक पूजा होते, त्यामुळे हा प्रवेश वर्जित आहे. महिलांचाही या परंपरेला विरोध नाही.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी