Navratri 2020: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा देवी चंद्रघटेची पूजा, जाणून घ्या व्रताची कथा, सिद्ध मंत्र

आध्यात्म
Updated Oct 19, 2020 | 12:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Devi Chandraghata Pooja: देवी चंद्रघटेची पूजा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी होते. जाणून घ्या पूजेचा विधी, कथा, मंत्र, आरतीसह देवीचा आवडता रंग.

Devi Chandraghanta
Navratri 2020: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी करा देवी चंद्रघटेची पूजा, जाणून घ्या व्रताची कथा, सिद्ध मंत्र 

थोडं पण कामाचं

  • देवी चंद्रघटा दुःख आणि त्रासांचे हरण करणारी आहे
  • ग्रहदोषचापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवीची पूजा जरूर करा
  • शत्रू आणि भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी देवीची आराधना करा

मुंबई: देवी चंद्रघटेची (Devi Chandraghanta) पूजा केल्याने अशुभ ग्रहांमुळे (unlucky planets) होणाऱ्या त्रासापासून मुक्ती (relief) मिळते. जर आपल्या आयुष्यात सतत तणाव (stressful life) येत असतील आणि कामे बिघडत असतील तर आपण देवी चंद्रघटेची पूजा जरूर करा. देवीच्या आशीर्वादाने अशुभ ग्रहांच्या प्रभावापासून मानवाला मुक्ती मिळते. देवीची पूजा केल्याने माणून निर्भय (fearless) तसेच सौम्य (soft) आणि विनम्र (obedient) होतो. इतकेच नाही, तर देवीची पूजा करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक तेज (glow on face) येते. चेहरा, डोळे तसेच संपूर्ण कायेवर एक कांती येते. जाणून घेऊया देवीची पूजा कशी करावी आणि तिचा आवडता रंग-पदार्थ, आरती, सिद्ध मंत्र आणि व्रताची कथा.

देवी चंद्रघंटेच्या पूजेची वेळ

१९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी ११:४५ ते दुपारी १२:३५ वाजेपर्यंत आहे. तर पुढचा शुभमुहूर्त दुपारी २:०२ ते ०२:४९पर्यंत आणि संध्याकाळचा मुहूर्त ०५:३९ ते ०६:१८ असा आहे.

देवी चंद्रघंटेचे स्वरूप

देवी चंद्रघंटेचे स्वरूप सौम्य आणि शांतिपूर्ण आहे. देवीचे वाहन वाघ आहे आणि तिच्यासोबतच तो वाघही सोन्याप्रमाणे चमकत असतो. देवी ही शांतिदायक आणि कल्याणकारी मानली जाते. देवीचे हे रूप भक्तगणांनना, संतांना आणि देवगणांनाही संतोष प्रदान करते. देवी राक्षसांचा वध करून त्यांच्या भीतीपासून मनुष्य आणि देवतांना मुक्ती देते. ती आपल्या भक्तांची दुःखे दूर करते आणि यासाठी तिच्या हातात धनुष्य, त्रिशूळ, तलवार आणि गदा असते. देवी चंद्रघंटेच्या माथ्यावर घंटेच्या आकारातला अर्धचंद्र दिसतो. यामुळेच तिला देवी चंद्रघंटा असे नाव पडले.

देवी चंद्रघंटेच्या पूजेचे महत्व

देवीला शरण जाणाऱ्यांचे हात कधीही रिकामे राहात नाहीत. शत्रूचे भय असेल तर देवीची पूजा खूप फलदायी असते. सोबतच जर कुंडलीतील ग्रह त्रास देत असतील किंवा कमजोर असतील तर देवीच्या पूजेने हे ग्रहदोष दूर होतात. भय दूर करणारी ही देवी आत्मविश्वास प्रदान कते. सोबतच सौंदर्यही देते.

देवी चंद्रघंटेच्या पूजेचा विधी

स्नान केल्यानंतर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेचे व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करा. यानंतर देवीला स्नान घालून वस्त्र प्रदान करा. त्यानंतर देवीचा शृंगार करा. तिला कुंकू, अक्षता, गंध, धूप, फुले इत्यादी अर्पण करा. देवीच्या समोर दुर्गाचालिसा पठण करा. देवी दुर्गेची आरती केल्यानंतर देवीच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडा. यानंतर “ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः” या मंत्राचा जप करा.

देवीला अर्पित करा या रंगाचे पुष्प आणि नैवेद्य

देवीच्या पूजेत चमेलीचे फूल अर्पित करणे शुभ असते. जर चमेली नसेल तर कोणतेही निळ्या किंवा लाल रंगाचे फूल देवीला वाहा. यादिवशी दुधाने बनवलेल्या कोणत्याही मिठाई किंवा हलव्याचा नैवेद्य दाखवा. रेवडी, पाढरे तीळ आणि गुळाचा नैवेद्यही आपण दाखवू शकता.

देवी चंद्रघंटेचा ध्यानमंत्र

“वन्दे वांछित लाभाय चन्द्रार्धकृत शेखरम्।

सिंहारूढा चंद्रघंटा यशस्वनीम्॥

मणिपुर स्थितां तृतीय दुर्गा त्रिनेत्राम्।

खंग, गदा, त्रिशूल,चापशर,पदम कमण्डलु माला वराभीतकराम्॥

पटाम्बर परिधानां मृदुहास्या नानालंकार भूषिताम्।

मंजीर हार केयूर,किंकिणि, रत्नकुण्डल मण्डिताम॥

प्रफुल्ल वंदना बिबाधारा कांत कपोलां तुगं कुचाम्।

कमनीयां लावाण्यां क्षीणकटि नितम्बनीम्॥”

देवी चंद्रघटेचा सिद्धमंत्र

पिण्डजप्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकेर्युता।

प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥

या देवी सर्वभू‍तेषु मां चन्द्रघण्टा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

देवी चंद्रघटेचे स्तोत्र

आपदुध्दारिणी त्वंहि आद्या शक्तिः शुभपराम्।

अणिमादि सिध्दिदात्री चंद्रघटा प्रणमाभ्यम्॥

चन्द्रमुखी इष्ट दात्री इष्टं मन्त्र स्वरूपणीम्।

धनदात्री, आनन्ददात्री चन्द्रघंटे प्रणमाभ्यहम्॥

नानारूपधारिणी इच्छानयी ऐश्वर्यदायनीम्।

सौभाग्यारोग्यदायिनी चंद्रघंटप्रणमाभ्यहम्॥

देवी चंद्रघटेची कथा

एकदा देवता आणि असुरांमध्ये दीर्घकाळ युद्ध चालू होते. असुरांचा स्वामी महिषासुर होता आणि देवतांच्या बाजूने इंद्रदेव नेतृत्व करत होते. महिषासुराने देवतांवर विजय मिळवून इंद्राचे सिंहासन बळकावले आणि तो स्वर्गलोकावर राज्य करू लागला. यामुळे सर्व देवता हैराण झाल्या आणि ब्रह्म, विष्णू आणि शंकर या त्रिदेवांकडे गेले. देवतांनी सांगितले की महिषासुराने इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि अग्नी या सर्व देवतांचे अधिकार हिरावून घेतले आहेत आणि त्यांना कैद करून तो स्वर्गलोकाचा राजा झाला आहे. हे ऐकून त्रिदेव संतप्त झाले आणि त्या क्रोधातून त्यांच्या मुखातून ऊर्जा उत्पन्न झाली. देवगणांच्या शरीरातली ऊर्जाही या ऊर्जेला जाऊन मिळाली आणि दशदिशांना पसरू लागली. त्यावेळी तिथे एक देवी अवतरली. भगवान शंकराने या देवीला त्रिशूळ, भगवान विष्णूने चक्र प्रदान केले. अशाप्रकारे इतर देवतांनीही या देवीच्या हातात आपापली शस्त्रास्त्रे दिली. इंद्रानेही आपले वज्र आणि आपला हत्ती ऐरावताच्या अंगावरील एक घंटा उतरवून तिला दिली. सूर्याने आपले तेज आणि तलवार दिली आणि वाहन म्हणून वाघ दिला. देवीचे इतके महाकाय रूप पाहून महिषासुर घाबरला आणि त्याने आपल्या सेनेला हल्ला करण्याचा आदेश दिला. इतर दैत्य आणि दानवही युद्धात उतरले. देवीने एका झटक्यात महिषासुराचा संहार केला.

देवी चंद्रघटेची आरती

नवरात्रि के तीसरे दिन चंद्रघंटा का ध्यान।

मस्तक पर है अर्ध चन्द्र, मंद मंद मुस्कान॥

दस हाथों में अस्त्र शस्त्र रखे खडग संग बांद।

घंटे के शब्द से हरती दुष्ट के प्राण॥

सिंह वाहिनी दुर्गा का चमके सवर्ण शरीर।

करती विपदा शान्ति हरे भक्त की पीर॥

मधुर वाणी को बोल कर सब को देती ग्यान।

जितने देवी देवता सभी करें सम्मान॥

अपने शांत सवभाव से सबका करती ध्यान।

भव सागर में फंसा हूं मैं, करो मेरा कल्याण॥

नवरात्रों की मां, कृपा कर दो मां।

जय मां चंद्रघंटा, जय मां चंद्रघंटा॥

अशाप्रकारे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटेची आराधना करा आणि आपल्या संकटांपासून मुक्ती मिळवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी