चैत्र नवरात्रीला अशाप्रकारे करा दुर्गा मातेची पुजा; आराधना करुन देवीला करा प्रसन्न

आध्यात्म
भरत जाधव
Updated Apr 10, 2021 | 19:37 IST

सनातन धर्मात नवरात्री खूप महत्वपूर्ण मानली जाते. माता जगदंबाच्या भक्तासाठी ९ दिवस खूप महत्त्वाचे असतात.

Worship Goddess Durga on Chaitra Navratri in this way
चैत्र नवरात्रीला अशाप्रकारे करा दुर्गा मातेची पुजा  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • १३ एप्रिलपासून नऊ दिवस करा दुर्गा मातेची पुजा
  • चैत्र महिन्यांच्या नवरात्री करा दुर्गा मातेची पुजा
  • नियमानुसार पुजा केल्याने मिळतं फळ

नवी दिल्ली  : सनातन धर्मात नवरात्री खूप महत्वपूर्ण मानली जाते. माता जगदंबाच्या भक्तासाठी ९ दिवस खूप महत्त्वाचे असतात. नवरात्रीच्या ९ दिवसात दुर्गा माताच्या विविध रुपांची पुजा होता. या दिवसात दुर्गा मातेच्या मंदिरांना सजवले जाते. तसेच जागरणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी चैत्र नवरात्री १३ एप्रिलपासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या दिवशी गुढीपाडवा ही आहे. जर तु्म्हाला माता दुर्गाला प्रसन्न करायचे असेल तर या लेखानुसार करा पुजा. (Worship Goddess Durga on Chaitra Navratri in this way)

इतकेच नाही तर या दिवशी विक्रम संवत २०७८ ची सुरुवात होत आहे. मार्कंडेय आणि देवी पुराणातही उल्लेख करण्यात आला की नवरात्री ९ दिवसात माता दुर्गेची पुजा विधी नुसार केली पाहिजे. अंस म्हटलं जातं की, जो भक्त या दिवसात माता दुर्गेची पुजा विधीनुसार करत नाही त्याला नवरात्रीचं फळ मिळत नाही.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा संकल्प

नवरात्रीच्या पहिला दिवस खूप महत्वाचा असतो. कारण या दिवशी घट स्थापित केला जातो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लवकर उठून नित्य विधी केल्यानंतर अंघोळ करुन देवघरात जावे. पुजा घराची साफ सफाई करावी. आता आपल्या उजव्या हातात फुले सुपारी, तांदूळ तसेच रुपया घेऊन माता दुर्गाच्या समोर उपवास करण्यासाठी संपल्प करा. पुजेची मांडणी तुम्ही केली तरी चालेल. नाहीतर तुम्ही पुरोहिताला बोलावूनही पुजेची मांडणी करू शकतात. संकल्प केल्यानंतर दुर्गा मातेच्या पायाला पाणी वाहून द्या.

नऊ दिवस अशी करा पुजा 

नवरात्रीच्या ९ दिवस उपवास करणाऱ्या सर्व भक्तांना सकाळी लवकर उठून आपल्या दैनिक विधी पुर्ण करून तसेच घराची सफाई करुन पूजेची तयारी केली पाहिजे. जेव्हा घराची सफाई केली जाईल तेव्हा गोमूत्र आणि गंगाजल शिंपडावे. नंतर त्यादिवशी माता दुर्गेच्या ज्या रुपाची पुजा केली जाते त्या रुपाची पुजा-अर्चा करावी. पुजा करण्याआधी पाणी आणि दुधाने माता दुर्गाला स्नान घालावे. त्यानंतर  चंदन, कुंकू, फुले, सुंगधित वस्तूंनी माता दुर्गेची पुजा करावी. त्यानंतर देवीला नैवद्य द्यावे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दिवा लावावा.  हा दिवा ९ दिवसांपर्यंत अखंड चालू द्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी