Navratri 2022: नवरात्रीत दुर्गेच्या 'या' नऊ रूपांची पूजा करा, घरात सुख-समाधान कायम राहील

आध्यात्म
Updated Sep 08, 2022 | 22:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shardiya Navratri 2022: शक्तीची देवता असलेल्या दुर्गेच्या उत्सवाला अर्थातच नवरात्रीला (Navratri) अवघे काही दिवस उरले आहेत. यादरम्यान नऊ दिवस मातेच्या विविध नऊ रूपांची पूजा (Worship these nine forms of Durga) केली जाते.

Worship these nine forms of Durga devi in Shardiya Navratri
नवरात्रीत दुर्गेच्या 'या' नऊ रुपांची पूजा करा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 26 सप्टेंबरपासू शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात
  • नवरात्रीत देवीच्या या नऊ रुपांची पूजा करा
  • सुख, समाधान, आणि शांततेसाठी देवीची भक्तीभावाने पूजा केली जाते.

Shardiya Navratri 2022 Worship: वेद आणि पुराणात आदिशक्तीच्या उपासनेची अनेक वर्णने आहेत. यावेळी 26 सप्टेंबर 2022 पासून शारदीय नवरात्रीला (Navratri) सुरुवात होत आहे. या दिवसांमध्ये दुर्गेच्या नऊ रुपांची विविधत पूजा (Worship these nine forms of Durga) केली जाते. देवी दुर्गा भक्तांना जीवनातील अडचणींशी लढण्याचं सामर्थ्य देते. या लेखात दुर्गेच्या या नऊ रूपांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. (Worship these nine forms of Durga devi in Shardiya Navratri)


शैलपुत्री

देवी दुर्गेच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री म्हणतात. या रुपातल्या देवीच्या पूजेने शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या म्हणून देवीचा जन्म झाला. त्यामुळे तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले. तिचे वाहन वृषभ आहे. 

ब्रह्मचारिणी

देवी दुर्गेच्या नऊ शक्तींपैकी दुसऱ्या शक्तीचे नाव ब्रह्मचारिणी आहे. ब्रह्म म्हणजे तपस्या किंवा तपश्चर्या, म्हणजेच जी तपस्या करते. या देवीच्या उजव्या हातात जपाची माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे.

 

अधिक वाचा : रणवीर सिंग पुन्हा एकदा लोकांच्या निशाण्यावर


चंद्रघंटा

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. आईचे हे रूप शांत आणि परोपकारी आहे. मातेच्या कपाळावर घंटेच्या आकाराची चंद्रकोर कोरलेली असते, म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात. मातेच्या घंटेच्या भयंकर आवाजाने भूत-दैत्य कायम भयभीत राहतात. 

कुष्मांडा

दुर्गेच्या चौथ्या रूपाला कुष्मांडा म्हणतात. देवीला तिच्या मंद आणि हलक्या हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती करते. त्यामुळे दुर्गेच्या या रुपाला कुष्मांडा म्हणतात. 

स्कंदमाता

देवीचे पाचवे रूप म्हणजे स्कंदमाता. देवीचे हे रुप स्कंदकुमार कार्तिकेय म्हणूनही ओळखले जाते. देवीचे वाहन सिंह आहे आणि बाल स्कंद देवीच्या मांडीवर बसलेले दिसतात.

अधिक वाचा : 'ब्रह्मास्त्र'च्या यशासाठी रणबीर कपूरचं बाप्पाकडे साकडं

कात्यायनी

हे देवी दुर्गेच्या सहाव्या रूपाचे नाव आहे. महिषासुराचा वध करण्यासाठी महर्षी कात्याय यांच्या पोटी कात्यायनी देवीने जन्म घेतला. देवीचे हे रूप वज्रमंडलाची प्रमुख देवता म्हणून पूजले जाते. 


कालरात्री

सप्तमीच्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा करण्याची प्रथा आहे. देवीचे हे रूप पूर्णपणे काळे आहे. डोक्यावरचे केस विखुरलेले आहेत आणि गळ्यात विजेसारखी चमकणारी माळ आहे. तीन डोळे असून वाहन गर्भ आहे. तिच्या नाकपुड्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडतात. वरच्या उजव्या हाताची वराह मुद्रा आणि खाली अभय मुद्रा आणि वरच्या डाव्या हातात लोखंडी काटा आणि खालच्या हातात खड्ग जे सर्वांना आशीर्वाद देते.

अधिक वाचा : हृतिक-सैफच्या 'विक्रम वेधा'चा trailer out

महागौरी

आठव्या शक्तीला महागौरी म्हणतात. या दिवशी देवीचा रंग पांढरा असून वाहन बैल आहे.देवीचे कपडे आणि दागिनेही पांढरे आहेत. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालच्या हातात आशीर्वाद मुद्रा आहे.  वरच्या उजव्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात त्रिशूळ आहे. देवीने पार्वतीच्या या रुपात शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी खूप कठोर तपश्च्रर्या केली होती. 

सिद्धिदात्री

नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीची सिद्धिदात्रीच्या रूपात पूजा केली जाते. तिचे वाहन सिंह असून ती  सर्व प्रकारच्या सिद्धींचा दाता आहे. तिच्या  उजव्या बाजूला खालच्या हातात चक्र, वरच्या हातात गदा, डाव्या बाजूला खालच्या हातात शंख आणि वरच्या हातात कमळाचे फूल आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी