यंदा २४ जूनला आहे योगिनी एकादशी

yogini ekadashi date 24 june 2022 shubh muhurta or shubh muhurat puja vrat vidhi : यंदा शुक्रवार २४ जून २०२२ रोजी योगिनी एकादशी आहे. ही आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. 

yogini ekadashi date 24 june 2022 shubh muhurta or shubh muhurat puja vrat vidhi
यंदा २४ जूनला आहे योगिनी एकादशी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • यंदा शुक्रवार २४ जून २०२२ रोजी योगिनी एकादशी
 • आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी
 • व्रत करून विष्णू देवाला प्रसन्न केल्यास ८८ ब्राह्मणांना भोजन दिल्यावर जेवढे पुण्य मिळते तेवढे पुण्य मिळते

yogini ekadashi date 24 june 2022 shubh muhurta or shubh muhurat puja vrat vidhi : यंदा शुक्रवार २४ जून २०२२ रोजी योगिनी एकादशी आहे. ही आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. 

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या दिवसाला एकादशी म्हणतात. भारतीय पंचागानुसार दर महिन्याला दोन या प्रमाणे दरवर्षी २४ वेळा एकादशी येते. एकादशी ही विष्णू देवाची प्रिय तिथी समजली जाते. एकादशीच्या कालावधीत उपवास करतात. विष्णू देवाचे नामस्मरण करतात. 

योगिनी एकादशीच्या दिवशी व्रत पूर्ण करून विष्णू देवाला प्रसन्न केल्यास ८८ ब्राह्मणांना भोजन दिल्यावर जेवढे पुण्य मिळते तेवढे प्रचंड पुण्य मिळते असे म्हणतात. 

धर्म-कर्म-भविष्यभविष्यात कायआध्यात्म

योगिनी एकादशी शुभ मुहूर्त : 

 1. योगिनी एकादशी : शुक्रवार २४ जून २०२२
 2. तिथी आरंभ किंवा तिथीची सुरुवात : गुरुवार २३ जून २०२२ रोजी रात्री ९ वाजून ४१ मिनिटे
 3. तिथी समाप्ती : शुक्रवार २४ जून २०२२ रोजी रात्री ११ वाजून १२ मिनिटे
 4. व्रत समाप्ती किंवा उपवास सोडण्याची शुभ वेळ : शनिवार २५ जून २०२२ रोजी पहाटे ५ वाजून ५१ मिनिटे ते सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत

योगिनी एकादशी निमित्त करायची पूजा

सकाळी लवकर उठून आंघोळ करून विष्णू देवाची मनोभावे पूजा करा. घरात देवघरामध्ये विष्णू देवाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा. विष्णू देवाला स्नान घालून नंतर विष्णू देवाची मनोभावे पूजा करा. विष्णू देवासमोर तुपाचा दिवा प्रज्वलित करा. गोड पदार्थ किंवा ताजी फळे यांच्यावर एक तुळशीचे पान ठेवून नंतर हा पदार्थ प्रसाद म्हणून विष्णू देवाला विधीवत अर्पण करा. दिवसभर जास्तीत जास्त विष्णू देवाचे नामस्मरण करा. 

योगिनी एकादशी व्रताची कथा

प्राचीन काळातील गोष्ट आहे. अलकापुरी नगरात कुबेर राजा होता. राजाने हेम नावाच्या माळ्याला एक काम दिले. दररोज मानसरोवर येथून शंकराच्या पूजेसाठी फुलं आणून द्यायची. एक दिवस पत्नीशी गप्पा मारताना हेम माळ्याला उशीर झाला. तो फुलं घेऊन आला तोपर्यंत खूप वेळ झाला होता. पूजेला उशीर झाला म्हणून राजा चिडला. राजाने हेम माळ्याला शाप दिला. 'तुला कोड होईल असे सांगितले' हेम माळ्याला कोड झाला. निराश झालेला हेम माळी त्याच अवस्थेत इथे तिथे भटकत राहिला.  भटकत असलेला हेम माळी मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. ऋषींनी त्यांच्या योगबळाने हेम माळ्याचे दुःख जाणून घेतले. ऋषींनी हेम माळ्याला योगिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. हेम माळ्याने योगिनी एकादशीचे व्रत केले. या व्रतामुळे हेम माळी शापमुक्त झाला, त्याच्या त्वचेवरील कोड निघून गेला. पुढे हेम माळ्याला मोक्ष मिळाला.

योगिनी एकादशीच्या दिवशी काय करावे?

 1. ताजी फळे खावी, सात्विक आहार घ्यावा. 
 2. मांसाहार, मद्य (दारू, अल्कोहोल मिश्रीत पदार्थ वा पेय), अंमली पदार्थ, मावा गुटखा, तंबाखू यांचे सेवन टाळावे. धूम्रपान करू नये.
 3. खोटे बोलू नये आणि कोणाला त्रास देऊ नये
 4. प्रामाणिकपणे काम करावे
 5. कर्तव्य व्यवस्थित पार पाडावी
 6. एकादशी काळात गरजूला अन्नदान, वस्त्रदान, पैशांच्या स्वरुपातील दान असे यथाशक्ती दान करावे. चांगल्या मनाने गरजूला दान केल्यास पुण्यसंचय होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी