Happy Ganesh Chaturthi HD Wishes in marathi । ३१ ऑगस्ट बुधवारी आपले लाडके गणपती बाप्पा आपल्या भेटीला येणार आहे. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता. आता कोरोनाचे संकट कमी झाले आहे, त्यामुळे आता मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणपतीचा हा सण ऑफलाईन साजरा करुयाच, तसेच आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊन हा सण ऑनलाईनही साजरा करूया.