Happy Dahi Handi marathi Wishes 2022 : श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून हा सण साजरा करतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा सण साजरा करता आला नाही. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीवरील सर्व निर्बंध हटवले असून मोठ्या उत्साहात हा सण साजरा होणार आहे. रस्त्यांवर, गल्लोगल्लींत हा सण साजरा होणारच आहे. सोशल मीडियावरही या गोकुळाष्टमीनिमित्त मराठीत शुभेच्छा देऊन हा सण साजरा करूया.