Happy Janmashtami Marathi Wishes 2022 : श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला. कंसापासून वाचवून वसुदेवाने श्रीकृष्णाला यशोदाकडे सोडले. हा सण जन्माष्टमी नावानेही ओळखला जातो. गोकुळात श्रीकृष्णाचा जम्न झाल्यानंतर लोकांनी आनंद साजरा केला. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रात्री श्रीकृष्णाच्या नावाने भजन म्हटले जाते तसेच नृत्यही केले जाते. यंदा जन्माष्टमीनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सोशल मीडियातून मराठीतून शुभेच्छा द्या.