Sant Namdev Death Anniversary special : आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. नामदेव महाराजांनी संपूर्ण भारतात प्रवास करून भागवत धर्माचा प्रसार केला. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवींपैकी एक आहेत. त्यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी झाला होता. १२९१ साली नामदेवांची ज्ञानेश्वरांची भेट झाली. गुरुशिवाय आपली भक्ती अधूरीच आहे अशी जाणीव त्यांना झाली. त्यानंतर नामदेव नागनाथ औंढा येथे गेले आणि विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेतला आणि शिष्यत्व पत्करले.