हिंदू धर्मात श्रावण महिन्याला फार महत्त्व आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे. हिंदू कालगणनेनुसार हा वर्षातला पाचवा महिना आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमेस किंवा आसपास श्रवण नक्षत्रं असतं म्हणून या महिन्याला श्रावण महिना म्हटले जाते. या महिन्यात हिंदू धर्मातील खुप सारे सण आणि उत्सव असतात. म्हणून या महिन्याला धार्मिक महत्त्व आहे.