Kalubai devi yatra: देवीच्या मंदिरात घुमला काळुबाईच्या नावानं चांगभलंचा आवाज; यात्रेला उत्साहाने सुरुवात

आध्यात्म
Updated Jan 07, 2023 | 13:48 IST

कोरोना महामारीमुळे श्री काळुबाई देवीची यात्रा भरत होती, परंतु भाविकांना दर्शन होत नव्हते. पौष महिन्यातली शाकंभरी पौर्णिमेच्या यात्रेचा आज मुख्य दिवस आहे.

थोडं पण कामाचं
  •  कोरोना महामारीमुळे श्री काळुबाई देवीची यात्रा भरत होती,
  • यंदा मात्र भाविकांना काळुबाईचे दर्शन करता येणार असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.
  • काळुबाईदेवीची यात्रा अतिशय आनंदाने 10 दिवस सुरू असते.

Kalubai devi yatra :  वाई :  कोरोना महामारीमुळे (Corona epidemic ) श्री काळुबाई देवीची (Kalubai devi) यात्रा भरत होती, परंतु भाविकांना (devotees) मातेचं दर्शन होत नव्हते. पौष महिन्यातील (Paush month) शाकंभरी (Shakambhari) पौर्णिमेच्या यात्रेचा आज मुख्य दिवस.आजपासून हजारो भाविक काळुबाईच्या दर्शनासाठी गर्दी करतील. कोरोनामुळे यात्रा भरत असली तरी भाविक मातेचं दर्शन करू शकत नव्हते. यंदा मात्र भाविकांना काळुबाईचे दर्शन करता येणार असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. (Goddess Kalubai pilgrimage begins)

पौष पौर्णिमा या दिवशी देवीने रत्नासूर आणि राक्यासूर या दोन्ही राक्षसांचा वध केल्यानंतर देवीने मांढर पर्वतावर विश्रांती घेतली.आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने राज्यातील हजारो भाविकांनी सकाळपासून रांगा लावल्या आहेत. काळुबाईदेवीची यात्रा अतिशय आनंदाने 10 दिवस सुरू असते.भाविकांची गर्दी असल्यामुळे पोलीस, प्रशासन आणि देवस्थान ट्रस्ट यांनी नीट नियोजन केल्यामुळे भाविकांचा  दर्शन खुप छान होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी