Navratri 2022 Marathi Wishes Video: शारदीय नवरात्रौत्सवाला (Navratri 2022) आजपासून (26 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. आज देवीच्यापारंपरिक पद्धतीने सर्वत्र घटस्थापना करण्यात येत आहे. आजपासून पुढील नऊ दिवस देवी मातेची वेगवेगळ्या स्वरुपात पूजा बांधली जाईल. या नऊ दिवसात आपण आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना खास व्हिडीओ शुभेच्छा देखील पाठवू शकता.
नवरात्रीनिमित्त राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली जाते. नवरात्री आणि दांडिया, रास गरबा हे देखील समीकरण आहे. गुजराती पारंपारिक वेषभूषेमध्ये तरूणाई सजून दांडिया आणि रास खेळण्यासाठी एकत्र जमतात.
आम्ही आपल्यासाठी असेच काही खास मेसेजचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत आपण हे खास ग्रीटिंग्ज संदेश व्हिडिओ (Navratri wishes and Quotes Video) वापरू शकता. तसेच व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा हा व्हिडीओ शेअर करु शकतात.
गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने, नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नऊ ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हणतात. निर्मितीशक्ती हीच आदिशक्ती आहे. म्हणून नऊ दिवसात पूजा करून दररोज एक याप्रमाणे नऊ माळा बांधतात. नवरात्रीचा हा सण यंदा उत्साहाने साजरा करण्यासाठी तुम्हीही व्हा सज्ज!