गौरींच्या आगमनाच्या दिवशी ऐका गौराईची गाणी, गणेशोत्सवात करा सुरांचीही सजावट

आध्यात्म
Updated Aug 26, 2020 | 16:42 IST

गणेशोत्सवाच्या उत्सााही वातावरणात गौरींच्या आगमनाचा दिवस म्हणजे दुग्धशर्करा योग. हाच योग आणखी गोड करण्यासाठी आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत गौराईची गाणी. ही गाणी ऐकून साजरा करा सुरेल गणेशोत्सव.

थोडं पण कामाचं
  • गौराईची गाणी ऐकत साजरे करा गौरीपूजन
  • गणपतीच्या सणासह आज गौरीच्या आगमनाचा दिवस
  • पाहा हा व्हीडियो आणि सुरेल करा गणेशोत्सव

सध्या घरोघरी गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंद, उत्साह आहे. गणपतीची सजावट, आरास, पक्वान्ने यांची रेलचेल सुरू आहे. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. याच वातावरणाची शोभा आणखी वाढवण्यासाठी आज गणेशाच्या मातेचे म्हणजेच गौरीचे आगमन घरांघरांमध्ये होत आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये ही गौर वेगवेगळ्या पद्धतीने आणली जाते. कुठे गौरीच्या मूर्ती असतात कर कुठे खड्याची गौर असते.

याच मंगल दिवशी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत गौराईची गाणी. गौरी किंवा पार्वती ही माहेरवाशिणींची देवता. त्यामुळे त्यांचे मन प्रसन्न करणारी ही गाणी आहेत. अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, कविता पौडवाल, मिलिंद शिंदे, आदर्श शिंदे आणि नेहा राजपाल यांच्या आवाजातील ही गाणी ऐका आणि गौरी-गणपतीचा हा सण सुरांनीही सजवा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी