महालक्षीच्या आगमनाच्या दिवशी पाहा महालक्षीची पवित्र कथा

आध्यात्म
Updated Aug 26, 2020 | 17:25 IST

गणेशोत्सवाचा पाचवा दिवस म्हणजे गौरीच्या आगमनाचा दिवस. गणरायाची आई माता पार्वती त्याला घेऊन जाण्यासाठी पृथ्वीवर येते आणि एक दिवस भक्तांचा पाहुणचार घेऊन त्याच्यासह पुन्हा कैलासात जाते अशी यामागची कहाणी आहे.

थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठागौरी-महालक्ष्मीच्या आगमनाचा आजचा पवित्र दिवस
  • महालक्ष्मीच्या व्रताची कहाणी ऐकल्याने पूर्ण होतात मनातील इच्छा
  • पाहा महालक्ष्मीची कथा व्हिडिओ स्वरूपात

गणेशोत्सवाचा पाचवा दिवस म्हणजे गौरीच्या आगमनाचा दिवस. गणरायाची आई माता पार्वती त्याला घेऊन जाण्यासाठी पृथ्वीवर येते आणि एक दिवस भक्तांचा पाहुणचार घेऊन त्याच्यासह पुन्हा कैलासात जाते अशी यामागची कहाणी आहे. या गौरींना ज्येष्ठागौरी किंवा महालक्ष्मी असेही म्हटले जाते.

महालक्ष्मीचे व्रत हे सुवासिनींसाठी अतिशय फलदायी मानले जाते. चातुर्मासाच्या कथांपैकी एक असलेली ही महालक्षीची आजच्या दिवशी ऐकल्याने मनातील इच्छित प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. हातात घेतलेला वसा अर्धवट टाकल्याने देवी महालक्षीचा कोप होतो आणि संसाराची धूळधाण होते, तर हे व्रत मनोभावे आणि श्रद्धेने केल्यास देवीची कृपा होते आणि मनातील इच्छिताची प्राप्ती होते. याचसाठी आम्हा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत महालक्षीची कथा व्हिडिओ स्वरूपात. पाहा हा व्हिडिओ आणि महालक्षीच्या आगमनाच्या मंगल दिवशी करा पुण्याची प्राप्ती. सध्या हा व्हिडिओ यूट्यूबवर देशात १५ स्थानावर ट्रेंड करीत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी