Vidarbhacha Raja: 'विदर्भाच्या राजा'ची विसर्जन मिरवणूक, पाहा VIDEO

आध्यात्म
Updated Sep 15, 2022 | 19:07 IST

Vidarbhacha Raja Ganpati: ‘विदर्भाच्या राजा’ची उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. 

Vidarbhacha Raja ganesha: अमरावती शहरासह विदर्भातील जनतेचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळात विदर्भाच्या राजाची (बाप्पाची) वाजत-गाजत विसर्जन शोभायात्रेला दुपारी ४ वाजता पासून सुरुवात झाली. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदा ‘विदर्भाच्या राजा’ची उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. विदर्भाच्या 5 जिल्ह्यांतील युवकांसह भाविकांची उपस्थिती यावेळी पहायला मिळाली. 7 ढोल पथक आणि वारकरी दिंडी, 5 विविध प्रकारचे चित्ररथ या यात्रेत समावेश आहे. (Vidarbhacha Raja Ganpati visarjan miravnuk watch video)

खापर्डे बगीचा मंडपातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन मिरवणूक खापर्डे बगीचा येथून इर्विन चौक, मर्च्युरी पॉइंट, रेल्वे स्टेशन चौक, रेल्वे स्टेशन ब्रिज, राजकमल चौक, श्याम चौक, सिटी कोतवाली, जयस्तंभ चौक, वसंत टॉकीज, दीपक चौक मार्गे मोसीकॉल जिनिंग येथील राम लक्ष्मण संकुल येथे ‘विदर्भाच्या राजा’ची आरती करून नियमानुसार बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे.

या निमित्त दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीत सजावट, रांगोळ्या, केळीच्या पानांनी सजविलेल्या खांब, दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. व्यापारी वर्गाकडून विविध ठिकाणी गुलाल आणि फुलांची उधळण करून बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी