दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०१ नोव्हेंबर २०१९: शरद पवार घेणार सोनियांची भेट ते मुसळधार पाऊस

Headlines of the 01th November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०१ नोव्हेंबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०१ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे...  शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा द्यायचा की सत्ते सामील व्हायचे याचा निर्णय घेण्यासाठी येत्या ३ ते ४ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, भाजपने एकट्यानेच शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु केली आहे. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ किंवा ६ नोव्हेंबरला भाजपच्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. तिसरी आजची बातमी, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  संदीप यांनी शिवाजी पार्क येथे मनसेतर्फे लावण्यात आलेले पक्षाचे झेंडे, कंदील आणि बॅनरविरोधात कारवाई करणाऱ्या सहायक आयुक्तांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. चौथी आजची महत्त्वाची बातमी, सुतळी बॉम्ब फुटल्यानं एका व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधल्या गुना जिल्ह्यात एका 28 वर्षांच्या वकिलाचा सुतळी बॉम्ब फुटल्यानं मृत्यू झाला.  पाचवी महत्त्वाची बातमी, विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसानं अचानक मुंबईत हजेरी लावली. दादर, परळ, कुलाबामध्ये संध्याकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी या भागात मुसळधार पाऊस पडतोय.  तसंच सीएसटी, चर्चगेट, मरीन लाइन्स, जुहू परिसरातही पावसानं हजेरी लावली. या बातम्या सविस्तर वाचूया. 

  1. शिवसेनेसाठी शरद पवार घेणार सोनियांची या दिवशी भेट : शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की सत्ते सामील व्हायचे याचा निर्णय घेण्यासाठी येत्या ३ ते ४ दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. सगळ्यात मोठी बातमी... शिवसेनेशिवाय भाजपचा शपथविधी सोहळा होणार, 'ही' तारीख ठरली! : सत्ता स्थापनेच्या संपूर्ण घडामोडी लक्षात घेता आता भाजपने आपला  शपथविधी सोहळा आटोपून घेण्याची तयारी सुरु केली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.
  3. MNS: निवडणुकीनंतर मनसेच्या 'या' नेत्याला अटक : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संदिप यांनी पक्षाचे झेंडे, कंदील आणि बॅनरविरोधात कारवाई करणाऱ्या सहायक आयुक्तांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. सावधान! सुतळी बॉम्बमुळे फुटली कवटी, वकिलाचा मृत्यू : सुतळी बॉम्ब फुटल्यानं एका व्यक्तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधल्या गुना जिल्ह्यात एका 28 वर्षांच्या वकिलाचा सुतळी बॉम्ब फुटल्यानं मृत्यू झाला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी, येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर म्हणजेच दिवाळीच्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पावसानं अचानक मुंबईत हजेरी लावली. दादर, परळ, कुलाबामध्ये संध्याकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. बातमी वाचण्यासाठी येथे लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी